मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hair Care Tips: मजबूत आणि सुंदर केसांसाठी अशी घ्या काळजी, उपयुक्त आहेत या हेअर केअर टिप्स

Hair Care Tips: मजबूत आणि सुंदर केसांसाठी अशी घ्या काळजी, उपयुक्त आहेत या हेअर केअर टिप्स

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 16, 2024 11:51 AM IST

Strong And Beautiful Hair: प्रत्येक मुलीला सुंदर, लांब आणि दाट केस हवे असतात. पण त्यासाठी केसांची योग्य काळजी घेणे सुद्धा महत्त्वाचे आहे. तुम्हाला मजबूत आणि सुंदर केस हवे असतील तर या हेअर केअर टिप्स फॉलो करा.

मजबूत आणि सुंदर केसांसाठी हेअर केअर टिप्स
मजबूत आणि सुंदर केसांसाठी हेअर केअर टिप्स (unsplash)

Hair Care Tips for Strong And Beautiful Hair: आजकाल बहुतांश लोक केसांच्या समस्येने त्रस्त आहेत. अनेक महिलांना सतत केस गळतीचा सामना करावा लागतो. वाढत्या वयानुसार ही समस्या वाढत जाते. अशा परिस्थितीत लहान वयातच केसांची काळजी घेतली तर केसांशी संबंधित समस्या टाळता येतात. लांब, दाट केस मिळवण्यासाठी आधी त्यांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहेत. तुम्हाला सुद्धा मजबूत आणि सुंदर केस हवे असतील तर या टिप्स फॉलो करायला विसरू नका. या हेअर केअर टिप्स तुमचे सुंदर केसांचे स्वप्न पूर्ण करतील.

ट्रेंडिंग न्यूज

सुंदर केस मिळवण्यासाठी फॉलो करा या गोष्टी

१. स्काल्प सीरम वापरा. केस गळणे हे अनहेल्दी स्काल्प किंवा जास्त कोरडे टाळू, कोंडा यामुळे होते. हे टाळण्यासाठी स्काल्प सीरम वापरणे आवश्यक आहे.

२. केस धुतल्यानंतर तुम्ही ते तसेच सोडून देत असाल तर ही चूक करू नका. कारण यामुळे केसांचे आणखी नुकसान होऊ शकते. केस धुतल्यानंतर केसांना सीरम लावा. जर तुमची टाळू कोरडी असेल तर ड्रायर वापरणे टाळा. कारण त्याचा वापर केल्याने केस अधिक कोरडे होतील.

३. केस धुण्यासाठी एक रुटीन फॉलो करा. जर तुम्ही रोज वर्कआउट करत असाल तर त्याने टाळू खूप चिकट होईल. त्यामुळे जास्त केस गळतात आणि त्यामुळे टाळूशी संबंधित समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत केस धुण्यासाठी एक रुटीन फॉलो करा.

४. केस धुण्याआधी केसांना तेल लावा. तुम्ही हे केस धुण्याच्या २ ते ३ दिवस आधी सुद्धा करू शकता. जर तुम्ही हे करू शकत नसाल तर केस धुण्याच्या आदल्या रात्री तेल लावू शकता. किंवा केस धुण्याच्या २ तास आधी तेल लावू शकता.

 

५. रोज रात्री केसांना ब्रश करा. हे दररोज करण्याचा प्रयत्न करा. हे करत असताना तुमचे केस खुले आहेत हे लक्षात ठेवा. केसांमध्ये गुंता राहणार नाही याची काळजी घ्या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग