मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  तांदळाने करा नॅचरल हेअर स्पा, फक्त फॉलो करा या ५ स्टेप्स

तांदळाने करा नॅचरल हेअर स्पा, फक्त फॉलो करा या ५ स्टेप्स

Hiral Shriram Gawande HT Marathi
Oct 06, 2022 11:58 AM IST

Hair Spa with Rice : ग्लोइंग स्किनसाठी तांदळाचे फायदे तर माहीत आहेत. नॅचरल हेअर स्पासाठी देखील तांदूळ फायदेशीर आहे. जाणून घ्या स्टेप्स.

तांदळाचे नॅचरल हेअर स्पा
तांदळाचे नॅचरल हेअर स्पा

Rice Hair Spa Steps : तांदूळ हे जगभरात खाल्ल्या जाणाऱ्या सर्वात आवडत्या धान्यांपैकी एक आहे. त्यात फोलेट, फोर्टिफाइड आणि बी-व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतात. हे खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की आरोग्याच्या फायद्यांव्यतिरिक्त केसांच्या आरोग्यासाठीही तांदूळ खूप फायदेशीर आहे. तांदळाने घरच्या घरी हेअर स्पा करायचा असेल तर त्याच्या स्टेप्स अगदी सोप्या आहेत. हा स्पा तुम्ही महिन्यातून एकदा करायलाच हवा.

केस धुवा

स्पा करण्‍यासाठी प्रथम केस माइल्ड शॅम्पूने धुवा. यामुळे तुमच्या केसातील सर्व धूळ आणि घाण साफ होईल. लक्षात ठेवा तुम्हाला कंडिशनर वापरण्याची गरज नाही.

हेअर मसाज

हेअर मसाज करण्यासाठी आधी तांदळाचे पाणी घेऊन स्प्रे बॉटलमध्ये भरा. त्यानंतर ते स्काल्प आणि केसांच्या लांबीपर्यंत स्प्रे करा. हलक्या हातांनी स्काल्पला मालिश करायला विसरु नका.

हेअर मास्क

हेअर मास्क बनवण्यासाठी प्रथम दोन चमचे दही, एक चमचा तांदळाचे बारीक पीठ, एक चमचा एलोवेरा जेल आणि एक व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करा. ते केसांना चांगले लावा. २० मिनिटे तसेच राहू द्या.

ऑइलिंग

केसांना लावलेले हेअर मास्क २० मिनीटांनंतर धुवून घ्या. ते नॉर्मल पाण्याने धुवा. लक्षात ठेवा तुम्हाला शॅम्पू करण्याची गरज नाही. आता ऑलिव्ह ऑईल घ्या आणि केसांच्या मुळापर्यंत लावा. १५ मिनिटे असेच ठेवा.

हेअर वॉश

आता तुम्हाला तेल काढण्यासाठी माइल्ड शॅम्पूने केस चांगले धुवावे लागतील. लक्षात ठेवा कंडिशनर वापरू नका. या थेरपीने तुमचे केस स्ट्राँग आणि शायनी दिसतील.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग