Holi Fashion Tips: होळीला दिसायचंय स्टायलिश? फॉलो करा या फॅशन टिप्स
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Holi Fashion Tips: होळीला दिसायचंय स्टायलिश? फॉलो करा या फॅशन टिप्स

Holi Fashion Tips: होळीला दिसायचंय स्टायलिश? फॉलो करा या फॅशन टिप्स

Mar 15, 2024 09:25 PM IST

Stylish Look For Holi: तुम्ही तुमच्या होळी पार्टीच्या लूकचा अजून काही प्लॅन केला नाही? टेन्शन सोडा आणि या होळीच्या फॅशन टिप्स पहा. या टिप्स तुम्हाला होळीला स्टायलिश लूक देतील.

होळीला स्टायलिश दिसण्यासाठी फॅशन टिप्स
होळीला स्टायलिश दिसण्यासाठी फॅशन टिप्स (unsplash)

Tips to Look Stylish on Holi: रंग आणि फॅशन यांचा संबंध खूप जुना आहे.दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण वाटतात. २५ मार्च रोजी देशभरात होळीचा सण साजरा केला जाणार आहे. होळीच्या दिवशी केवळ रंग खेळणे आणि चविष्ट खाद्यपदार्थ महत्त्वाचे नसून हा सण पूर्ण करण्यासाठी तुमचा होळीचा लूकही महत्त्वाचा असतो. जर तुम्ही तुमच्या होळी पार्टीच्या लुकबद्दल अजून काही प्लॅन केलेले नसेल, तर टेन्शन सोडून या होळीच्या फॅशन टिप्स पहा. या रंगीबेरंगी होळीच्या फॅशन टिप्स तुमच्या सणाची मजा तर द्विगुणित करतीलच शिवाय तुमच्या सणाला आणखी स्टायलिश बनवतील.

टाय अँड डाय दुपट्टा

होळीवर तुमचा लुक पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्लेन व्हाइट सूटसोबत तुमच्या आवडत्या रंगाचा टाय आणि डाय दुपट्टा कॅरी करून तुमचा एथनिक लुक पूर्ण करू शकता. जर तुम्हाला वेस्टर्न ड्रेसमध्ये कंफर्टेबल वाटत असेल तरी सुद्धा टाय आणि डायचा हलका लुक नक्कीच कॅरी करा. होळीच्या लूकसाठी, तुम्ही पांढऱ्या टी-शर्ट किंवा टॉपसोबत टाय आणि डाय पॅन्ट कॅरी करू शकता किंवा प्लेन व्हाईट कुर्तीसोबत टाय आणि डाय जॅकेटने इंडो वेस्टर्न लुक मिळवू शकता.

मल्टी कलर टी-शर्ट

आजकाल तरुणांमध्ये मल्टी कलर टी-शर्टचा ट्रेंड खूप प्रसिद्ध आहे. जर तुम्ही होळी पार्टीत जाणार असाल तर तुम्ही रेन्बो प्रिंट किंवा मल्टी कलर टी-शर्ट कॅरी करू शकता.

सनग्लासेस

होळीच्या पार्टीत सनग्लासेस हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. हे घातल्यानंतर तुम्ही स्मार्ट तर दिसालच पण तुमचे डोळेही सुरक्षित राहतील.

होळी एक्सेसरीज

होळी आउटफिटचा ग्रेस तोपर्यंत पूर्ण होत नाही जोपर्यंत त्यासोबत घातलेली ज्वेलरी सुद्धा होळीच्या रंगांना मॅच करणारी आणि रंगामुळे खराब होणार नाही अशी असेल. या एक्सेसरीजमध्ये तुम्ही सनग्लासेस, मॅचिंग हेअर बँड, हेड स्कार्फ कॅरी करू शकता. तुम्हाला एक यूनिक लुक देण्यासोबतच हेड स्कार्फ तुमच्या केसांना सुद्धा रंगाने खराब होण्यापासून वाचवेल.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner