Threading Tricks: आयब्रो करताना खूप वेदना होतात? आराम देतील या सोप्या ट्रिक्स
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Threading Tricks: आयब्रो करताना खूप वेदना होतात? आराम देतील या सोप्या ट्रिक्स

Threading Tricks: आयब्रो करताना खूप वेदना होतात? आराम देतील या सोप्या ट्रिक्स

Published Mar 19, 2024 03:52 PM IST

Beauty Tricks: आयब्रो केल्यानंतर चेहरा अधिक खुलतो. पण थ्रेडिंग करताना होणाऱ्या त्रासामुळे अनेक महिला करण्यापूर्वी विचार करतात. थ्रेडिंग करताना तुम्हाला वेदना होत असल्यास तुम्ही या ट्रिक्स ट्राय करू शकता.

आयब्रो करताना वेदना कमी करण्यासाठी ट्रिक्स
आयब्रो करताना वेदना कमी करण्यासाठी ट्रिक्स (unsplash)

Tricks to Get Rid of Threading Pain: जाड आणि दाट भुवया छान दिसतात.परंतु चांगल्या लुकसाठी त्यांना योग्य आकार देणे खूप महत्वाचे आहे. यामुळेच काही महिला दर महिन्याला याला शेप देतात. यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य वाढते. पण काही स्त्रिया आयब्रोला शेप देण्यासाठी थ्रेडिंग टाळतात. कारण त्यामुळे खूप वेदना होतात, विशेषत: ज्यांच्या केसांची वाढ खूप जास्त आहे. जर तुम्हालाही थ्रेडिंग करताना खूप वेदना होत असतील तर तुम्ही या ट्रिक्स फॉलो करून वेदनांपासून आराम मिळवू शकता.

१. वेदनांचा सामना करण्यासाठी थ्रेडिंग करण्यापूर्वी आयब्रोवर बर्फ लावा. याने कूलिंग इफेक्ट मिळते. ज्यामुळे वेदना होत नाही. वास्तविक बर्फ लावल्याने त्वचा सुन्न होते, ज्यामुळे थ्रेडिंग करताना वेदना जाणवत नाहीत.

२. थ्रेडिंग करताना कोरफड जेल लावता येते.हे केवळ आयब्रो काढण्यापूर्वीच नाही तर नंतर देखील लावू शकता. या जेलमध्ये असलेला कूलिंग इफेक्ट तुम्हाला वेदना आणि जळजळ या दोन्हीपासून वाचवेल.

३. थ्रेडिंग करताना त्वचा नेहमी टाइट ठेवा. यासाठी दोन्ही हातांनी वरची आणि खालची त्वचा ओढून घ्या. जेव्हा त्वचा टाइट राहते तेव्हा तुम्हाला वेदना जाणवत नाहीत.

४. थ्रेडिंग करताना पावडर वापरली जाते. परंतु जर जास्त वेदना होत असतील तर ते जास्त प्रमाणात लावावे. हे लावल्याने केस काढणे सोपे होते. त्यामुळे वेदनाही कमी होतील

५. थ्रेडिंगमुळे होणाऱ्या वेदनांचा सामना करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे धागा ओला करणे. असे केल्याने वेदनाही कमी होतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner