Tricks to Remove Burnt Smell From Milk: दुधाचा वापर प्रत्येक घरात होतो. एकदा दूध करपले की, त्यातून करपट वास दूर करणे अशक्य वाटते. करपलेल्या दुधापासून बनवलेल्या चहाची चवही वाईट असते. आणि ते प्यायला कोणालाच आवडत नाही. अशा परिस्थितीत दुधाचा करपट वास दूर करण्यासाठी तुम्ही काही ट्रिक्स अवलंबू शकता. करपलेल्या दुधाच्या वासाची समस्या सोडवण्यासाठी २ सोप्या ट्रिक्स जाणून घेऊया
दुधात करपट वास जास्त येत असेल तर त्यावर उपाय करण्यासाठी प्रथम दूध स्वच्छ भांड्यात काढून घ्या. नंतर कढईत थोडं तूप गरम करून त्यात तमालपत्र, वेलची आणि लवंगा घाला. ते चांगले भाजून घ्या. शिजल्यानंतर हे दुधात घाला. काही वेळ तसंच राहू द्या आणि मग दुधातून काढून टाका. आता तुम्ही हे दूध पिऊ शकता आणि त्यापासून चहा देखील बनवू शकता.
करपलेल्या दुधाचा तीव्र वास येत असेल तर दालचिनीचा वापर करावा. यासाठी सर्वप्रथम नवीन व स्वच्छ भांड्यात दूध वेगळे करावे. यानंतर देशी तुपात दालचिनीच्या २ काड्या घालून गरम करा. नंतर हे मिश्रण दुधात घालून बाजूला ठेवा. असे केल्याने दुधाला करपट वास बर्याच प्रमाणात दूर होईल. हे दूध पीठ मळण्यासाठी वापरता येते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)