मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Monsoon Diet Tips: पावसाळ्यात आजारांपासून राहायचं असेल दूर तर फॉलो करा या डाएट टिप्स

Monsoon Diet Tips: पावसाळ्यात आजारांपासून राहायचं असेल दूर तर फॉलो करा या डाएट टिप्स

Jul 04, 2024 12:16 PM IST

Monsoon Health Care Tips: पावसाळ्यात बहुतांश लोकांना पोटदुखी आणि अॅसिडिटीचा त्रास होतो. या ऋतूत आजार टाळायचे असतील तर काही डाएट टिप्स फॉलो करायला सुरुवात करा.

पावसाळ्यासाठी हेल्दी डाएट टिप्स
पावसाळ्यासाठी हेल्दी डाएट टिप्स (freepik)

Healthy Diet Tips for Monsoon: पावसाळ्यात फक्त लहान मुलेच नाही तर मोठ्यांना सुद्धा आजारांचा मोठा धोका असतो. या ऋतूत संसर्ग अतिशय वेगाने पसरतो. जर एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर त्याच्या शरीरात पावसाळ्यातील सामान्य आजार सहज विकसित होतात. अनेक लोकांना या काळात पोटाशी संबंधित आजारांचा वारंवार त्रास होतो. तर काही लोक संसर्गजन्य आजारांना बळी पडतात. पावसाळ्यातील हे सर्व आजार टाळण्यासाठी या काळात सकस आहार घेणं अत्यंत गरजेचं आहे. पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकता. जाणून घ्या पावसाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी उपयुक्त टिप्स

पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी फॉलो करा या डाएट टिप्स

- पावसाळ्यात आहारात लसणाचा समावेश केल्यास रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होते.

ट्रेंडिंग न्यूज

- या काळात दही मोठ्या प्रमाणात घ्या. कारण यामुळे हानिकारक बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करण्याचा धोका कमी होतो.

- शरीर उबदार आणि सुरक्षित ठेवण्यासाठी कॅफिनयुक्त पेयांपेक्षा गरम पेयांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करा.

- केवळ उकळलेले आणि स्वच्छ पाणीच पिण्याचा प्रयत्न करा. कारण हा असा ऋतू आहे ज्यात जास्त इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. थेट नळाचे पाणी पिणे टाळा.

- आलं, तुळस, दालचिनी, काळी मिरी, वेलची आणि लवंग सोबत हर्बल कोमट पाणी घेतल्यास इन्फेक्शन टाळता येते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते.

- जेवणात मीठाचे प्रमाण कमी करा. मीठ वॉटर रिटेंशन आणि उच्च रक्तदाबाचे कारण बनते. ज्यामुळे पावसाळ्यात ही समस्या वाढू शकते.

- पावसाळ्यात कच्चे सलाद खाणे टाळा. सलाद खायचे असेल तर ते खाण्यापूर्वी वाफवून घ्या.

- या ऋतूत आधीच चिरून ठेवलेली फळं, तळलेले अन्न, जंक फूड किंवा कोणतेही स्ट्रीट फूड खाणे पूर्णपणे टाळावे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel