Cool and Comfy Fashion Trends for Summer: कडक उन्हाळा सुरू झाला आहे. अशा स्थितीत घराबाहेर पडताना असे कपडे घालावेसे वाटतात जे अगदी कंफर्टेबल असतात. पण स्टाईलचे काय? कारण स्टायलिश दिसायचे असेल तर ट्रेंडी कपडे घालणेही गरजेचे आहे. तर या उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे कपडे घालू शकता. सिंपल आणि क्लासी लुकसोबतच बोल्ड आणि व्हायब्रंट कलर्सही चांगले दिसतील. तुमच्या पर्सनॅलिटीनुसार फ्लोरल प्रिंट आणि पेस्टल कर्लस सोबतच काही बोल्ड लूक सुद्धा ट्राय करता येतो. जर तुम्ही ट्रेंडशी जुळणारा स्टायलिश आणि आरामदायी लुक शोधत असाल तर या कपड्यांना नक्कीच तुमच्या वॉर्डरोबचा भाग बनवा.
फ्लोरल ड्रेस आणि डेनिम जॅकेट
तुम्हाला नेहमी स्टाईलमध्ये राहायला आवडत असेल तर तुम्ही डेनिम जॅकेट किंवा शर्ट जरूर ठेवला असेल. त्यामुळे या उन्हाळ्यात तुमच्या फ्लोरल पॅटर्नच्या ड्रेससोबत डेनिम जॅकेट किंवा शर्ट ट्राय करा. हे कूल लुक देण्यासोबतच ते आरामदायीही बनवेल. डेनिम जॅकेटसह ट्यूब डिझाइन ड्रेस पासून नूडल स्ट्राइप ड्रेस पर्यंतचे विविध ड्रेस सहज घालू शकता.
जंपसूट आहे ट्रेंडी
फ्लोरल प्रिंट जंपसूट तुम्हाला या उन्हाळ्यात फक्त सुंदर लुक देणार नाहीत तर तुम्ही खूप स्टायलिशही दिसाल. फ्रेंड्ससोबत मस्ती असो वा डिनरसाठी बाहेर जायचे असो, फ्लोरल पॅटर्न जंपसूटला तुम्ही हाय हील्स किंवा स्नीकर्ससह पेअर करु शकता.
क्रॉप टॉप
क्रॉप टॉपची फॅशन यंदाही ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही हाय वेस्ट जीन्स, शॉर्ट्स, स्कर्ट, पॅंटसह ते पेअर करु शकता. ते प्रत्येक प्रकारे स्टायलिश दिसेल. क्रॉप टॉपच्या डिझाइनमध्ये खूप वैविध्य आहे. जे तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि प्रसंगानुसार निवडू शकता. दिशा पटानीपासून ते अनन्या पांडेपर्यंत, अनेकदा आपले अॅब्स फ्लाँट करण्यासाठी लो वेस्ट जॉगर्स पँटसोबत क्रॉप टॉप घालताना दिसतात.
टँक टॉप
टँक टॉप हा उन्हाळ्याचा आवडता पोशाख आहे. जे कोणत्याही अतिरिक्त प्रयत्नाशिवाय कूस आणि स्टायलिश लुक देते. मलायका अरोरा अनेक वेळा टँक टॉपमध्ये स्टायलिश लूकमध्ये दिसली आहे. हे जॉगर्स पॅंट पासून तर टाइट फिटिंग जीन्स किंवा शॉर्ट्स सोबत सहजपणे पेअर केले जाऊ शकते.
जॉगर पॅन्ट
जर तुम्ही उन्हाळ्यात जीन्स घालणे टाळत असाल तर यावेळी जॉगर पॅन्ट ट्राय करा. ते खूप हलके आणि स्टाइलिश दिसतात. कूल लुक देण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारे स्टाइल करता येते. त्यामुळे या उन्हाळ्यात लेटेस्ट ट्रेंडसह सज्ज व्हा आणि सर्वांचे लक्ष वेधून घ्या.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या