मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cooking Tips: कमी वेळेत बनवायचं आहे टेस्टी जेवण? मदत करतील या सोप्या कुकिंग टिप्स

Cooking Tips: कमी वेळेत बनवायचं आहे टेस्टी जेवण? मदत करतील या सोप्या कुकिंग टिप्स

Jul 04, 2024 10:04 PM IST

Cooking Tips in Marathi: आज आम्ही तुम्हाला असे कुकिंग टिप्स सांगत आहोत, जे केवळ तुमचे जेवण टेस्टी करणार नाही तर तासन् तास लागणारा काम मिनिटात पूर्ण होईल.

 कुकिंग टिप्स
कुकिंग टिप्स (unsplash)

Cooking Tips to Make Tasty Food in Less Time: कुटुंबाच्या आरोग्यासोबत स्वादिष्ट जेवण बनवण्याची जबाबदारी घरातील महिलांवर असते. पण तासन् तास स्वयंपाकघरात उभे राहून जेवण तयार करणे सोपे काम नसते. ज्यामुळे महिला अनेकदा दुपारचे किंवा रात्रीचे जेवण तयार करताना नेहमीच सोपा हेल्दी पर्याय शोधत असतात. पण आज आम्ही तुमच्यासोबत काही सोप्या कुकिंग टिप्स शेअर करत आहोत, ज्या फॉलो करून अवघड वाटणारे जेवण चविष्ट तर होईलच, शिवाय तासन्तास वेळ लागणारे काम मिनिटात पूर्ण होऊन तुमचा मौल्यवान वेळही वाचेल. कमी वेळेत टेस्टी जेवण बनवण्यासाठी जाणून घ्या कुकिंग टिप्स

कांदा आणि लसूण

बहुतांश भाज्यांची चव वाढवण्यासाठी कांदा आणि लसूणची पेस्ट तयार केली जाते. पण कांदा आणि लसूण कापण्यात आणि सोलण्यात बराच वेळ वाया जातो. अशावेळी आपला वेळ आणि पदार्थांची चव टिकवून ठेवण्यासाठी लसूण कांदा अगोदरच तयार करून साठवून ठेवावा. यासाठी एका कढईत तेल घालून त्यात चिरलेला कांदा घालून २-३ मिनिटे परतून एका जारमध्ये भरून घ्या. आता त्याच तेलात लसणाच्या कळ्या तळून साठवून ठेवा. या दोन्ही वस्तू सुमारे १० दिवस साठवून ठेवता येतात. गरज पडल्यास त्याचा वापर करून वेळ आणि चव या दोन्ही गोष्टींची काळजी घेऊ शकता.

ट्रेंडिंग न्यूज

डेझर्टची चव वाढेल

जर तुम्ही डेझर्ट बनवत असाल तर बनवताना त्यात चिमूटभर मीठ घाला. यामुळे डेझर्टची चव आणखी वाढेल.

ग्रेव्हीचा रंग सुधारण्यासाठी

कोणत्याही भाजीसाठी ग्रेव्ही तयार करताना कांदा भाजत असताना त्यात चिमूटभर साखर घाला. यामुळे ग्रेव्हीचा रंग वाढेल आणि चवही वाढेल.

पुरी तेल शोषून घेण्यापासून रोखण्यासाठी

जर तुम्ही पुरी बनवण्याचा विचार करत असाल तर पुरी लाटून झाल्यावर थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा. असे केल्याने पुरी तळताना जास्त तेल शोषणार नाही.

हलव्याची चव वाढवण्यासाठी

रव्याचा शिरा किंवा हलवा बनवताना रवा भाजताना थोडे बेसन घालावे. त्यामुळे हलवा अधिक चवदार होतो.

सॉफ्ट पोळीसाठी

जर तुमची पोळी किंवा पराठा खूप टाइट बनत असेल तर चेना फाडल्यानंतर उरलेले पाणी पीठ मळण्यासाठी वापरा. यामुळे पोळी किंवा पराठा अधिक चविष्ट आणि मऊ होईल.

बटाटे उकळताना कुकर काळा पडणार नाही

बऱ्याचदा बटाटे उकळताना कुकर आतून काळा पडतो. जे अनेक वेळा घासल्यावरही सहज साफ होत नाही. पण कुकर स्वच्छ करण्यासाठी बटाटे उकळताना त्यात मीठ आणि लिंबाचा तुकडा घालून शिट्टी घ्यावी. या टिप्स फॉलो केल्याने बटाट्याची सालही लवकर बाहेर पडेल आणि कुकर आतून काळा होणार नाही.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel
विभाग