Tips to Make Perfect Masala Tea: चहा हे भारतातील लोकप्रिय पेयांपैकी एक आहे. बहुतेक लोकांना ते प्यायला आवडते. अनेक लोकांची तर सकाळी चहा प्यायल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. तर संध्याकाळी टी टाईम ब्रेक हा अनेकांचा आवडता असतो. प्रत्येक जण चहा बनवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. काही लोक फिका चहा पितात तर काहींना केवळ दुधात चहापत्ती टाकून प्यायला आवडतात. थंडीच्या दिवसात मसाला चहा पिण्याचा एक वेगळाच आनंद असतो. तुम्हाला सुद्धा घरी परफेक्ट मसाला चहा (perfect masala tea) बनवयाचा असेल तर तुम्ही या काही सोप्या टिप्स (cooking tips) फॉलो करू शकता.
जेव्हा तुम्ही योग्य चहापत्ती निवडता तेव्हा उत्तम मसाला चहा तयार होतो. चांगली चहापत्ती चव वाढवतात. त्यामुळे चहापत्ती खरेदी करताना काळजी घ्या.
मसाल्यांमुळे मसाला चहा चांगला बनतो. एका सॉस पॅनमध्ये दालचिनी, वेलची, लवंगा, आले आणि काळी मिरी यांसारख्या सुगंधी मसाल्यांचे मिश्रण घ्या. हे भाजून बारीक करून घ्या. ही पावडर तुम्ही चहामध्ये वापरू शकता. या गोष्टी चहाची चव आणि सुगंध वाढवतात.
चहा बनवताना चहापत्ती टाकण्यापूर्वी पाणी आणि मसाले काही मिनिटे एकत्र उकळू द्या. फ्लेवर्स नीट मिक्स होऊ द्या. पाण्याला मंद उकळी आणा.
मसाला चहामध्ये दूध महत्त्वाची भूमिका बजावते. तुमचा चहा आणि मसाले शिजल्यावर भांड्यात दूध घालून मंद उकळी आणा. दूध केवळ मसाल्यांची तीव्रता कमी करणार नाही तर चहाला मखमली पोत देखील देईल. चहामध्ये दुधाचे प्रमाण योग्य असणे आवश्यक आहे. तरच परफेक्ट चव मिळेल.
मसाला चहामध्ये गोडपणा घालणे ही वैयक्तिक पसंती आहे. काही लोक मसाल्यांच्या नैसर्गिक गोडपणाला प्राधान्य देतात. तर काही जण चव वाढवण्यासाठी साखर, गूळ किंवा त्यांचे आवडते स्वीटनर घालतात. ते पूर्णपणे विरघळेपर्यंत मिसळत रहा. साखर वापरताना चहाची चव खराब होणार नाही याची काळजी घ्या.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या