Cooking Tips: सँडविच बराच वेळ राहील क्रिस्पी, या टिप्स होणार नाही सॉगी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cooking Tips: सँडविच बराच वेळ राहील क्रिस्पी, या टिप्स होणार नाही सॉगी

Cooking Tips: सँडविच बराच वेळ राहील क्रिस्पी, या टिप्स होणार नाही सॉगी

Nov 03, 2023 08:56 PM IST

Sandwich makeing Tips: सँडविचबद्दल एक तक्रार नेहमी असते की ते काही वेळाने ओले होऊ लागतात. त्यामुळे ते क्रिस्पी राहत नाही आणि त्याची चव बिघडते. हे टाळण्यासाठी या टिप्स फॉलो करा.

सँडविच क्रिस्पी बनवण्यासाठी टिप्स
सँडविच क्रिस्पी बनवण्यासाठी टिप्स (freepik)

Tips to make Crispy And Soggy-Free Sandwich: घरी सँडविच बनवणे सोपे असले तरी घरातील महिलांना अनेकदा सँडविचबद्दल तक्रार असते की काही वेळाने ते ओले होऊ लागतात. त्यामुळे त्यांची चव आणि कुरकुरीतपणा पूर्वीसारखा राहत नाही. सँडविच बनवल्यानंतर काही वेळाने तुम्हालाही असे वाटत असेल तर तुमच्या समस्येवर मात करण्यासाठी या सोप्या कुकिंग टिप्स फॉलो करा.

सँडविच लवकर ओले का होतात?

वास्तविक सँडविचमध्ये वापरल्या जाणार्‍या बहुतेक पदार्थांमध्ये ओलावा असतो, ज्यामुळे सँडविच काही काळानंतर ओलसर आणि मऊ होऊ लागते.

सँडविचला सॉगी होण्यापासून रोखण्यासाठी टिप्स

चांगली ब्रेड निवडा

बहुतेक लोक सँडविच बनवण्यासाठी पांढरा किंवा ब्राऊन ब्रेड वापरतात. पण तुम्हाला माहित आहे का की सँडविचसाठी सर्वोत्तम ब्रेड म्हणजे जाड ब्रेड असते. या प्रकारच्या ब्रेडमध्ये लवकर ओल्या होत नाही.

चीज स्प्रेड किंवा मेयोनीज बाबतीत कंजूषी करू नका

चीज स्प्रेड किंवा मेयोनीज यांसारख्या गोष्टी सँडविचला मऊ होण्यापासून आणि तुटण्यापासून रोखू शकतात. हे ब्रेड आणि फिलिंगमध्ये अडथळा म्हणून काम करून ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात.

बटर लावा

चीज स्प्रेड किंवा मेयोनीज प्रमाणे बटर देखील फिलिंगच्या दरम्यान अडथळा म्हणून कार्य करते. उरलेले साहित्य स्लाइसवर लावण्यापूर्वी वितळलेले बटर ब्रेडवर हळूवारपणे ब्रश करा. हे सँडविचची चव वाढवताना डबल बॅरियर निर्माण करण्यास मदत करते.

सँडविचमध्ये गरम घटक वापरू नका

सँडविचमध्ये गरम गोष्टी घालणे टाळा. असे केल्याने फिलिंगमध्ये जास्त ओलावा निर्माण होईल आणि तुमचे सँडविच थोड्या वेळाने सॉगी होईल. हे टाळण्यासाठी तुमच्या सँडविचमधील सँडविचचे घटक रुम टेम्परेचरला आल्यावरच वापरा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner