French Fries: संध्याकाळच्या चहासोबत बनवा क्रिस्पी फ्रेंच फ्राईज, बनवण्यासाठी फॉलो करा या टिप्स
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  French Fries: संध्याकाळच्या चहासोबत बनवा क्रिस्पी फ्रेंच फ्राईज, बनवण्यासाठी फॉलो करा या टिप्स

French Fries: संध्याकाळच्या चहासोबत बनवा क्रिस्पी फ्रेंच फ्राईज, बनवण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Nov 25, 2023 07:00 PM IST

Cooking Hacks: तुम्हाला सुद्धा रेस्टॉरंटसारखे क्रिस्पी फ्रेंच फ्राइज बनवायचे असतील तर तुम्ही मास्टर शेफ पंकज भदौरिया यांनी सांगितलेले कुकिंग हॅक्स ट्राय करु शकता.

क्रिस्पी फ्रेंच फ्राइज बनवण्यासाठी कुकिंग हॅक्स
क्रिस्पी फ्रेंच फ्राइज बनवण्यासाठी कुकिंग हॅक्स (unsplash)

Cooking Hacks to Make Crispy French Fries: तुम्हालाही संध्याकाळच्या चहासोबत नेहमीचे स्नॅक्स खाण्याचा कंटाळा आला असेल, तर रेस्टॉरंट स्टाइल क्रिस्पी फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी या सोप्या टिप्स वापरून पहा. फ्रेंच फ्राईज बनवण्याच्या या टिप्स सोप्या तर आहेतच पण त्या तुमच्या चहाची चवही वाढवतील. मास्टर शेफ पंकज भदौरिया यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून घरच्या घरी रेस्टॉरंटसारखे फ्रेंच फ्राईज कसे बनवता येतात याचे सीक्रेट सांगितले आहे.

फ्रेंच फ्राईज करण्यासाठी या सोप्या टिप्स फॉलो करा

- फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी प्रथम बटाटे सोलून घ्या. त्यांचे १/४ जाड तुकडे करा. ते स्वच्छ पाण्याने धुवा आणि बाजूला ठेवा.

- यानंतर फ्रेंच फ्राईज प्री-कुक करण्यासाठी एका पॅनमध्ये एक लिटर थंड पाणी घेऊन त्यात एक चमचा व्हिनेगर, एक चमचा मीठ

घालून ७-८ मिनिटे उकळा.

- एक मिनिटानंतर उकळत्या पाण्यातून फ्राईज काढून घ्या आणि कापडावर ठेवा.

- यानंतर शिजवलेले बटाटे गरम तेलात सुमारे ५० सेकंद तळून घ्या.

- हे तळलेले फ्रेंच फ्राईज पूर्णपणे थंड झाल्यावर फ्रीज प्रूफ कंटेनरमध्ये वेगळे काढा आणि ते सॉलिड फ्रोजन होत नाही जोपर्यंत फ्रीझ करा.

- लक्षात ठेवा की हे फ्राईज डीप फ्रोज करायचे नाही.

- यानंतर हे फ्रीज केलेले फ्राईज पुन्हा हाय फ्लेमवर सोनेरी होईपर्यंत तळा.

- हे तळलेले फ्रेंच फ्राईज तेलातून काढा आणि लगेच मीठ आणि मिरपूड घालून सीजनिंग करा.

Whats_app_banner