Cleaning Tips for Diwali: घराच्या साफसफाईचं टेन्शन विसरा, या टिप्सने वाचेल वेळ आणि मेहनत
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cleaning Tips for Diwali: घराच्या साफसफाईचं टेन्शन विसरा, या टिप्सने वाचेल वेळ आणि मेहनत

Cleaning Tips for Diwali: घराच्या साफसफाईचं टेन्शन विसरा, या टिप्सने वाचेल वेळ आणि मेहनत

Published Oct 30, 2023 09:21 PM IST

Diwali Cleaning Hacks: दिवाळीची तयारी सगळीकडे जोरात सुरु आहे. तुम्हीही घराची साफसफाई करायला सुरुवात केली असेल तर आधी या टिप्स पाहा. हे तुमचे काम सोपे करेल.

दिवाळीची साफसफाई करण्यासाठी क्लीनिंग टिप्स
दिवाळीची साफसफाई करण्यासाठी क्लीनिंग टिप्स (unsplash)

Cleaning Tips To Save Time And Energy: दिवाळी म्हटली की सर्वात कठीण काम वाटते ते म्हणजे घराची साफसफाई करणे. दिवाळीची तयारी सुरु झाली आहे. तुम्ही अजूनही साफसफाई सुरु केली नसेल तर अजिबात टेन्शन घेऊ नका. काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही कमी वेळेत आणि मेहनत करून घर साफ करू शकता. अनेक वेळा मेहनत करूनही घर हवे तसे साफ वाटत नाही. अशा परिस्थितीत काही क्लीनिंग टिप्स लक्षात ठेवा. जे तुमचे घर स्वच्छ ठेवण्यास मदत करेल. चला जाणून घ्या या काही क्लीनिंग टिप्स, जे तुमचे काम तर सोपे करतीलच शिवाय तुमची वेळ आणि मेहनतही वाचवतील.

किचन सिंक साफ करणे

किचन सिंक नेहमी चमकती ठेवणे खूप अवघड असते. स्टेनलेस स्टीलची सिंक खरकट्या भांड्यामुळे लवकर चिकट दिसू लागते. हे साफ करण्यासाठी तुम्ही लिंबाची साल वापरू शकता. वापरलेल्या लिंबाच्या सालीवर वॉशिंग पावडर शिंपडून त्याने किचन सिंक स्वच्छ करा. सिंक लवकर साफ होईल.

ओव्हन स्वच्छ करण्यासाठी ट्रिक

ओव्हनमध्ये विविध प्रकारचे अन्न शिजवल्याने आणि गरम केल्याने त्यातून दुर्गंधी येऊ लागते. या वासापासून सुटका हवी असेल तर एका भांड्यात लिंबाचा रस पाण्यात मिक्स करा. सुमारे १० मिनिटे ते ओव्हनमध्ये गरम करा. ओव्हनमधील सर्व वास निघून जातील.

लॅपटॉप कीबोर्डची स्वच्छता

साधारण प्रत्येक जण लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वापरतो. पण त्याच्या कीबोर्डवर साचलेल्या घाणीकडे फार कमी लक्ष दिले जाते. जर तुमचा कीबोर्ड खराब झाला असेल, त्यावर धूळ जमा झाली असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी कॉटन बड्स वापरा. हे सर्व कीज स्वच्छ करेल आणि प्रत्येक कोपऱ्यातील घाण काढून टाकेल.

 

प्राण्यांचे फर कसे स्वच्छ करावे

हल्ली अनेक लोकांकडे पाळी प्राणी असतात. पण जेव्हा त्यांचे केस घरात पडतात तेव्हा ते खूप खराब दिसतात आणि साफ करणे सुद्धा अवघड वाटते. जर तुमच्या पलंगावर आणि सोफ्यावर पाळीव प्राण्याचे फर अडकले असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी जुना सॉक्स वापरा. हे मोजे सहजपणे फर पकडतील आणि झटपट स्वच्छता होईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner