Long Hair Tips: काही दिवसात कंबरेपर्यंत लांब होतील केस, फक्त ट्राय करा यापैकी एक पद्धत-follow these best methods to get long hair ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Long Hair Tips: काही दिवसात कंबरेपर्यंत लांब होतील केस, फक्त ट्राय करा यापैकी एक पद्धत

Long Hair Tips: काही दिवसात कंबरेपर्यंत लांब होतील केस, फक्त ट्राय करा यापैकी एक पद्धत

Aug 27, 2024 01:39 PM IST

Hair Care Tips in Marathi: लांब केस प्रत्येक मुलीला आवडतात. जर तुमच्या केसांची वाढ होत नसेल किंवा ती खूप हळू होत असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय फॉलो करू शकता. या पद्धतींचा अवलंब केल्यास तुमच्या केसांची वाढ जलद होईल आणि काही दिवसांतच तुमचे केस कंबरेपर्यंत लांब होतील.

long hair - लांब केस मिळवण्यासाठी पद्धत
long hair - लांब केस मिळवण्यासाठी पद्धत (freepik)

Best Methods to Get Long Hair: लांब आणि दाट केस तुमच्या सौंदर्यात भर घालू शकतात. पण आजकाल खराब झालेली खाण्यापिण्याची सवय आणि चुकीचे हेअर केअर यामुळे केसांची वाढ थांबली आहे किंवा कमी झाली आहे. त्याचबरोबर केस गळल्यामुळे देखील केस कमी होतात. ज्यामुळे केस पातळ होत असतात. हे रासायनिक हेअर प्रॉडक्ट्स वापरल्यामुळे सुद्धा होते. तसे तर छोटे केसही खूप चांगले दिसतात. पण केस कंबरे इतके लांब असावेत असे वाटत असेल तर या पद्धतींचा अवलंब करा. काही घरगुती उपायांचा अवलंब करून तुम्ही हेअर ग्रोथ वाढवू शकता तसेच हेअर फॉल कमी करू शकता. चला तर जाणून घ्या कंबरेपर्यंत लांब केस मिळवण्यासाठी कोणत्या पद्धती फॉलो कराव्या.

लांब केसांसाठी काय करावे

जास्वंद

केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी हिबिस्कस फॉर्म्युलेशनचा वापर केला जाऊ शकतो. हिबिस्कस म्हणजेच जास्वंदाचे पान आणि फूल या दोन्हींमध्ये केस वाढवणारे गुणधर्म असल्याचे अहवालात म्हटले आहे. फुलांचा अर्क कोमट पाण्यात भिजवून केसांना लावता येतो.

कोरफड

कोरफडमध्ये गुंतागुंतीची प्रथिने असतात जी केराटिनसारखीच असतात. हे प्रोटीन केसांच्या वाढीस चालना देते. हे केसांचे रोम मजबूत करण्यासाठी प्रभावी आहे. कोरफडीचा रस केसांना लावा आणि थोडा वेळ राहू द्या. कोरफड तेल इतर तेलांमध्ये सुद्धा मिसळले जाऊ शकते.

खोबरेल तेल

नारळाचे तेल केसांना चमकदार गुणवत्ता देऊ शकते. हे कंडिशनरचे काम करते आणि केसांमधून प्रथिने नष्ट होण्यापासून प्रतिबंधित करते. हे केसांच्या पुनरुत्पादनास प्रोत्साहित करते. हे थेट केसांना लावून मसाज करा.

लसूण

केसांच्या पुनर्वाढीसाठी लसूण प्रभावी आहे. टाळूवर लावण्यापूर्वी लसूण फोडून दहीमध्ये मिक्स करा आणि नंतर लावा. लसणाच्या तेलाचा वापर डोक्यावर चोळण्यासाठीही केला जाऊ शकतो.

भृंगराज तेल

भृंगराज केसांचे रोम वाढवून केसांच्या वाढीस चालना देते. यामुळे केस काळे होतात. हे केस गळती रोखते आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहित करते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग