Tips to Get Rid of Dark Knees and Elbows: चेहऱ्याचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आपण रोज अनेक गोष्टी करत असतो. पार्लरमध्ये ट्रीटमेंट करण्यासोबतच घरगुती उपायही केले जातात. परंतु जेव्हा कोपर आणि गुडघ्यांचा प्रश्न येतो तेव्हा बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. ज्यामुळे काही काळानंतर शरीराच्या या दोन भागांचा रंग काळा पडू लागतो. शरीराचे हे काळे भाग कधी कधी त्या व्यक्तीसाठी लाजिरवाणे ठरू लागतात. काळजी न घेतल्याने जर तुमच्या कोपराचा आणि गुडघ्यांचा रंग काळा पडू लागला असेल तर टेन्शन सोडून या सोप्या ब्युटी टिप्स फॉलो करा. या ब्युटी टिप्सच्या मदतीने तुम्ही काही दिवसांतच गुडघे आणि कोपरांच्या काळेपणापासून सहज सुटका मिळवू शकाल.
बेकिंग सोडा एक नैसर्गिक एक्सफोलिएटर आहे, जो मृत त्वचा काढून त्वचेचा काळापणा दूर करण्यास मदत करतो. याचा वापर केल्याने त्वचा चमकदार होते. हा उपाय करण्यासाठी एक चमचा बेकिंग सोड्यामध्ये १ चमचा पाणी किंवा दही मिसळून ही पेस्ट कोपरावर आणि गुडघ्यांवर लावा.
कोपर आणि गुडघ्याचा काळेपणा दूर करण्यासाठी नारळ तेलाचे काही थेंब गुडघा आणि कोपरात दोन ते तीन वेळा लावून सुमारे १५ मिनिटे मसाज करावा. हा उपाय केल्याने काही दिवसांतच फरक दिसेल.
कोपर आणि गुडघ्याचा काळेपणा दूर करण्यासाठी लिंबाचा उपाय देखील फायदेशीर ठरू शकतो. हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम लिंबू अर्धे कापून कोपरावर आणि गुडघ्यावर हलकेच चोळावे. थोडा वेळ घासल्यानंतर पाण्याने धुवून मॉइश्चरायझर लावा. याचा वापर केल्यानंतर उन्हात जाणे टाळा.
दहीमध्ये व्हिनेगरचे काही थेंब मिसळून प्रभावित भागावर लावावे. दह्याची ही पेस्ट सुकल्यानंतर कोमट पाण्याने धुवून घ्या. असे केल्याने कोपर आणि गुडघ्यांचा काळापणा दूर होतो आणि त्वचेतील ओलावाही राहतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)