Morning Habits: सकाळी केलेल्या या ६ गोष्टी हार्मोनल इम्बॅलेन्सची समस्या करतील दूर, आजच सुरु करा
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Morning Habits: सकाळी केलेल्या या ६ गोष्टी हार्मोनल इम्बॅलेन्सची समस्या करतील दूर, आजच सुरु करा

Morning Habits: सकाळी केलेल्या या ६ गोष्टी हार्मोनल इम्बॅलेन्सची समस्या करतील दूर, आजच सुरु करा

Published Oct 27, 2023 11:40 PM IST

Hormonal Balance: सकाळच्या काही सवयी शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. जर हार्मोनल असंतुलनाची समस्या असेल तर रोज सकाळी या ६ सवयी पाळल्यास हार्मोन्स नियंत्रित राहतील.

मॉर्निंग हॅबिट्स
मॉर्निंग हॅबिट्स (unsplash)

Morning Habit To Regulate Hormonal Imbalance: हार्मोनल असंतुलनाची समस्या महिलांना अधिक त्रास देते. त्यामुळे त्यांना थायरॉइडचा त्रास, मासिक पाळी अनियमित होणे, वजन वाढणे, त्वचेवर खाज येणे, चिंता, नैराश्य, ऊर्जेची कमतरता अशा अनेक समस्या त्रास देतात. हार्मोन्स हे एक प्रकारचे रसायन आहे जे ग्रंथींमधून बाहेर पडतात आणि रक्तप्रवाहात प्रवेश करतात. त्यामुळे शरीराची अनेक कार्ये योग्य प्रकारे होतात. जेव्हा या हार्मोन्समध्ये अडथळा येतो तेव्हा ते वेगवेगळ्या रोगांच्या रूपात दिसून येते. या हार्मोन्समध्ये व्यत्यय विविध कारणांमुळे होतो. सकाळच्या या ६ सवयींच्या मदतीने हार्मोनल असंतुलन दुरुस्त केले जाऊ शकते

सकाळी उन्हात बसणे

सकाळी उठल्यानंतर उन्हात बसणे हे हार्मोन्सचे संतुलन राखण्याचे उत्तम सूत्र आहे. हार्मोन्सचे नियमन करण्यात सूर्यकिरण महत्त्वाची भूमिका बजावतात. याशिवाय झोपेची पद्धतही सुधारते. उन्हात बसणे विशेषतः मेलाटोनिन हार्मोनच्या निर्मितीसाठी आणि बॉडी क्लॉक योग्य राहण्यासाठी आवश्यक आहे. यासोबतच सकाळचा सूर्यप्रकाश व्हिटॅमिन डीचा समृद्ध स्रोत आहे. ज्यामुळे हाडे मजबूत होतात.

स्ट्रेचिंग आणि व्यायाम

सकाळी उठल्याबरोबर हलका व्यायाम आणि स्ट्रेचिंग केल्याने हार्मोन्स वाढण्यास मदत होते. स्क्वॅट्स, पुल-अप्स, पुशअप्स, क्रंचेस हे आदर्श व्यायाम आहेत. हे थोड्या थोड्या अंतराने करा. जितका जास्त व्यायाम कराल तितके जास्त हार्मोन्स बाहेर पडतात. जर सुरुवातीच्या व्यायामामध्ये हार्मोन्सचे संतुलन दिसून येत नसेल तर ते सतत आणि जास्त प्रमाणात करा. हार्मोन्स संतुलित होण्यास सुरवात होईल.

दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने करू नका

जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर चहा किंवा कॉफीने दिवसाची सुरुवात करत असाल तर ही सवय लगेच बदला. सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पचनक्रियेत फरक पडतो. डॉक्टरांचे म्हणणे आहे की जास्त प्रमाणात कॅफीन प्यायल्याने कॉर्टिसॉल हार्मोनचे उत्पादन वाढते. ज्यामुळे शरीरात सूज येऊ शकते. त्यामुळे हार्मोनल असंतुलनाची समस्याही निर्माण होते.

प्रथिनेयुक्त नाश्ता करा

जर तुम्ही सकाळी उठल्यापासून अर्ध्या तासाच्या आत प्रोटीनयुक्त नाश्ता केला तर हार्मोन्सचे नियमन करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. प्रथिनेयुक्त नाश्ता इंसुलिन आणि कोर्टिसोल संतुलित करते. यामुळे दिवसभर एनर्जी राहते आणि तुमचे लक्ष दिवसभर कामावर राहते. हेल्दी ब्रेकफास्ट केवळ हार्मोन्स निरोगी ठेवत नाही तर चयापचय देखील निरोगी ठेवते.

ऑइल पुलिंग

दररोज ऑइल पुलिंग किंवा तेलाने गुळणा करण्याची सवय हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करते. आजीच्या रेमेडीनुसार ऑइल पुलिंग केल्याने मासिक पाळी नियमित राहते जी पूर्णपणे हार्मोन्सशी संबंधित असते. आणि प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोमची समस्या ठीक होते.

 

हिरव्या गवतावर चालणे

सकाळी ताज्या हिरव्या गवतावर चालणे केवळ शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्या देखील रिलॅक्स वाटते. यामुळे कॉर्टिसोल हार्मोन्सचे सामान्य उत्पादन होते आणि रक्तातील साखरेचे नियमन होते. इतकेच नाही तर सकाळी गवतावर अनवाणी चालल्याने चयापचय सुधारण्यास मदत होतेच पण शरीरातील सूज कमी होण्यास आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner