Hair Spa: हिवाळ्यात केसांचा कोरडेपणा दूर करेल हेअर स्पा, घरी करा या ४ स्टेप्स
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hair Spa: हिवाळ्यात केसांचा कोरडेपणा दूर करेल हेअर स्पा, घरी करा या ४ स्टेप्स

Hair Spa: हिवाळ्यात केसांचा कोरडेपणा दूर करेल हेअर स्पा, घरी करा या ४ स्टेप्स

Jan 28, 2024 01:17 PM IST

Hair Spa At Home: हिवाळ्यात केस कोरडे आणि निर्जीव होतात. अशा परिस्थितीत केवळ शॅम्पू किंवा तेल उपयुक्त नाही. तर घरच्या घरी अशा प्रकारे हेअर स्पा करा.

घरी हेअर स्पा करण्यासाठी स्टेप्स
घरी हेअर स्पा करण्यासाठी स्टेप्स (unsplash)

Steps To Do Hair Spa At Home: हिवाळ्यात केस खूप कोरडे आणि निर्जीव होतात. चेहऱ्याप्रमाणेच त्यातील ओलावा सुद्धा कमी होतो. त्यामुळे केस गळणेही सुरू होते. हा कोरडेपणा दूर करण्यासाठी तुम्ही पार्लरमध्ये स्पा ट्रीटमेंट घेणार असाल तर यावेळी घरच्या घरी फक्त ४ स्टेप्समध्ये हेअर स्पा पूर्ण करा. तुमचे केस मऊ आणि चमकदार होतील. घरच्या घरी हेअर स्पा कसे करायचे ते जाणून घेऊया. या ४ स्टेप्सनी तुम्ही सोप्या पद्धतीने ते करू शकता.

स्टेप १

हेअर स्पा करण्यासाठी सर्वप्रथम तेलाने मालिश करणे आवश्यक आहे. केसांना ऑलिव्ह ऑइलने मसाज केल्याने व्हिटॅमिन ई आणि भरपूर पोषण मिळते. तसेच केस चमकदार आणि मजबूत होतात. केसांच्या मुळांना नीट तेल लावून ते तसेच राहू द्या.

स्टेप २

केसांना स्टीम देणे महत्वाचे आहे. वाफेमुळे केसांच्या छिद्रांमध्ये तेल पोहोचते आणि केसांना संपूर्ण पोषण मिळते. यामुळे केस मजबूत आणि दाट होतात. तसेत ते सिल्की सुद्धा होतात. घरी केसांना स्टीम देण्यासाठी गरम पाण्यात टॉवेल नीट भिजवा. नंतर ते पूर्णपणे पिळून घ्या आणि केसांना गुंडाळा. जर केस खूप कोरडे असतील तर ते सुमारे २०-२५ मिनिटे स्टीम द्या. यामुळे केसांचा कोरडेपणा दूर होतो.

स्टेप ३

अतिशय माइल्ड सल्फेट फ्री शॅम्पूने केस धुवा. तसेच केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. जेणेकरून केसांवरील तेल सहज निघून जाईल. केसांवर जास्त गरम पाणी वापरू नका.

स्टेप ४

- घरी हेअर मास्क लावा. केसांना अधिक सिल्की आणि सॉफ् बनवण्यासाठी घरगुती हेअर पॅक लावा. तरच हेअर स्पा पूर्ण होईल.

- केस गळती रोखण्यासाठी मेथीच्या दाण्यांपासून बनवलेला हेअर मास्क चांगला असतो.

हेअर मास्क बनवण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.

- मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी या पाण्यासोबत मेथीचे दाणे बारीक करून पेस्ट बनवा.

- आता त्यात मध आणि दही घाला. केस मजबूत करण्यासाठी होममेड हेअर मास्क तयार आहे.

- आता ही पेस्ट केसांना मुळापासून टोकापर्यंत लावा.

- पुन्हा एकदा गरम टॉवेलमध्ये १० मिनिटे केस गुंडाळा.

- नंतर कोमट पाण्याने केस धुवा. यामुळे केस मऊ आणि चमकदार होतील. याशिवाय केस गळणेही थांबेल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner