मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Weight Loss: वजन कमी करायचं आहे? फॉलो करा ९०-३०-५० डाएट प्लॅन!

Weight Loss: वजन कमी करायचं आहे? फॉलो करा ९०-३०-५० डाएट प्लॅन!

Jan 18, 2024 11:13 AM IST

90-30-50 Diet Benefits: योग्य डाएट केलं वजन झपाट्याने कमी करता येते. यासाठी तुम्ही ९०-३०-५० हा डाएट प्लॅन फॉलो करू शकता.

diet for weight loss
diet for weight loss (Pixabay )

Diet Plans: वाढेलेलं वजन कसं कमी करायचे यावर नेहमी चर्चा होते. अनेक वेगवेगळे उपाय सांगितले जातात. सध्या वजन कमी करण्याच्या अनेक आधुनिक पद्धती ट्रेंडमध्ये आल्या आहेत.पण अनेकदा अशा पद्धती जर आहारतज्ञ किंवा पोषणतज्ञांना न विचारता फॉलो केल्या तर नुकसान होऊ शकते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की यामुळे लोकांमध्ये मानसिक दडपणही येऊ शकते. तुम्हालाही वजन कमी करायचं असेल तर तुम्ही ९०-३०-५० हा डाएट प्लॅन फॉलो करू शकता. यामुळे आपली पचनक्रिया सुधारते आणि मेटाबॉलिज्म रेट सुधारतो. चला जाणून घेऊयात या खास डाएट प्लॅनबद्दल...

काय आहे ९०-३०-५० डाएट प्लॅन?

या प्लॅनमध्ये ९० टक्के पोषक आहार, ३० टक्के कॅलरीज आणि हेल्दी फॅट्स आणि ५० टक्के कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण ठेवावे लागते.

कसे काम करतो हा डाएट प्लॅन?

या डाएटचे योग्य पद्धतीने पालन केले तर आरोग्य आणि फिटनेस या दोन्ही गोष्टींचा फायदा होतो. याची सवय लागली तर तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता. कॅलरीज आणि हेल्दी फॅट्स आपल्या शरीराला हेल्दी ठेवतात. यामुळे मेटाबॉलिज्म सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

ट्रेंडिंग न्यूज

कसं करायचं फॉलो?

९०-३०-५० डाएट प्लॅन फॉलो करणे सोपे आहे. हा डाएट प्लॅन फॉलो करणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या आहारात ९० टक्के पौष्टिक पदार्थ, ३० टक्के हेल्दी फॅट्स आणि ५० टक्के कार्बोहायड्रेट असे प्रमाण ठेवावे.

या गोष्टी लक्षात ठेवा

या डाएटसोबत तुम्ही तुमचे शरीर शक्य तितके हायड्रेटेड ठेवा. दिवसभरात २ ते ३ लिटर पाणी प्या. सोबतीला फळांचे रससुद्धा घ्या. पाण्याच्या कमतरतेमुळे अन्न नीट पचत नाही ज्यामुळे वजन वाढते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्या. काही दिवसात तुम्हाला फरक दिसून येईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel