Seeds Rotation Therapy For PCOS: पीसीओएस म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम ही स्त्रियांमधील सर्वात सामान्य समस्या आहे. ज्याचे पहिले लक्षण म्हणजे अनेकदा अनियमित मासिक पाळी. मात्र, अनियमित मासिक पाळीव्यतिरिक्त अनेक समस्या यामुळे निर्माण होतात. पीसीओएस हा हार्मोनल असंतुलनामुळे होणारा आजार आहे. जे सहसा तरुण मुलींमध्ये सुद्धा दिसू लागते. योग्य वेळी मासिक पाळी न येणे ही बहुतांश महिला आणि मुलींची समस्या असते. याला सामोरे जाण्यास सीड्स मदत करू शकतात. अनेक न्यूट्रिशन एक्स्पर्ट सांगतात की, जर ४ प्रकारच्या सीड्स रोटेशन नुसार खाल्ले तर त्यांचे आश्चर्यकारक फायदे मिळतात. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या सीड्स आणि त्या कशा खाव्यात.
- फ्लेक्स सीड्स
- भोपळ्याच्या बिया
- पांढरे तीळ
फ्लेक्स सीड्स आणि भोपळ्याच्या बिया मासिक पाळी सुरू झाल्यापासून पुढील १४ दिवस दररोज सकाळी एक चमचा खावे. त्याच प्रमाणे पुढील १४ दिवस दररोज एक चमचा सूर्यफूलाच्या बिया आणि पांढरे तीळ खावे. सुमारे ३ महिने अशा प्रकारे सीड्स खाल्ल्याने पीसीओएसच्या समस्येमध्ये आराम मिळतो.
पीसीओएसवर हा रामबाण उपाय असल्याचे डॉ. श्वेता नागर यांनी सोशल मीडियावर सांगितले. मासिक पाळीच्या काळात या सीड्स अशा प्रकारे कार्य करतात. फ्लेक्स सीड्स आणि भोपळ्याच्या बिया इस्ट्रोजेनच्या पातळीस समर्थन देण्यास मदत करतात. सूर्यफूलाच्या बिया आणि तीळ मासिक पाळीनंतर प्रोजेस्टेरॉनचे उत्पादन वाढवतात. ज्यामुळे गर्भधारणा करणे सोपे होते आणि मासिक पाळीचे चक्रही योग्य असते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)