Chanakya Niti: चाणक्य नीती ही प्रसिद्ध आचार्य चाणक्य यांनी लिहली होती. त्यात अनेक गोष्टींबद्दल तपशीलवार लिहले आहे. आजही यश मिळवण्यासाठी चाणक्य नीती फॉलो केली जाते. अनेकदा असे होते की जे यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करतात पण त्यांना हवं ते यश मिळत नाही. अनेकदा असं होते की अन्यथा संघर्ष, परिश्रम दोन्ही व्यर्थ जातात आणि यश मिळत नाही. यशाचा मार्ग कधीच सोपा नसतो. चाणक्य सांगतात की, माणसाला यश मिळवण्यासाठी समर्पणाची भावना हवी. कठीण मार्गही समर्पणाने सोपा होतो. हवं ते यश मिळवण्यासाठी काय करावे ते जाणून घ्या.
> यशाकडे जाण्यासाठी नम्रता हा गुण असणे फार गरजेचे आहे. अनेक वेळा यशस्वी होण्यासाठी माणसाने आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. कारण तुमचे बोलणे यशाला अपयशात बदलू शकते.
> निष्काळजीपणा माणसाला त्याच्या टार्गेटपासून विचलित करतो. यामुळे संधी हिरावून घेतली जाते. यशस्वी व्हायचे असेल तर डोळे आणि कान उघडे ठेवा. तुमचा निष्काळजीपणा इतरांना जिंकण्याची संधी देऊ शकतो.
> महत्वाची कामे, त्यांचे निर्णय उशीरा घेणे, उशिरा करणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. नेहमीच शिस्तबद्ध रहा आणि वेळेचे भान ठेवून योग्य वेळी निर्णय घ्या.
> तुम्हाला भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी स्वतःला तयार करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)