Benefits of walking without shoes: गवतावर अनवाणी चालण्याचे फायदे तुम्ही ऐकलेच असतील. पण तुम्हाला माहित आहे का की, केवळ गवतावरच नाही तर कुठेही अनवाणी चालण्याने तुम्हाला अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात. शूज किंवा चप्पल न घालता जमिनीवर चालण्याच्या या प्रथेला ग्राउंडिंग असेही म्हणतात. अनवाणी चालणे तुमच्या हृदयासाठी, मानसिक आरोग्यासाठी आणि स्नायूंसाठी खूप फायदेशीर आहे. अनवाणी चालण्याच्या या सरावामुळे तुम्हाला कोणते फायदे मिळू शकतात ते जाणून घेऊया.
अनवाणी चालण्याने तुमच्या पायांचे स्नायू आणि अस्थिबंध मजबूत होतात. ज्यामुळे पाठीच्या खालच्या भागाला चांगला आधार मिळतो. तसेच, या सरावाने, चालताना तुमच्या पायांची स्थिती सुधारते. ज्यामुळे टाचांवर कमी ताण येतो आणि तुमचे नितंब, गुडघे आणि पाठदुखी थांबते. शिवाय पायांमध्ये ताकत येते.
ग्राउंडिंगचा अर्थातच अनवाणी चालण्याचा सराव केल्याने तुमचा ताण कमी होतो. अनवाणी चालणे तुमच्या मेंदूसाठी खूप उत्तेजक असू शकते. ज्यामुळे चिंता आणि तणाव कमी होतो. तुमच्या पायाखालचा निसर्ग अनुभवणे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
जेव्हा आपण शूज किंवा कोणतेही पादत्राणे घालून फिरता, तेव्हा तुमच्या पायाच्या संवेदी धमण्या कमी सक्रिय राहतात. कारण शूज सर्व गोष्टींपासून त्यांचे संरक्षण करतात. पण अनवाणी चालल्याने आपल्या पायाच्या संवेदी धमण्या सक्रिय होतात आणि तुमचे शरीर अधिक सक्रिय आणि ताजेतवाने राहते.
अनवाणी चालल्याने तुमचे मानसिक आरोग्य सुधारते. तुमचे शरीर आरामशीर होते आणि तुम्हाला चांगली झोप घेण्यास मदत होते. त्यामुळे चांगल्या झोपेसाठी तुम्ही ग्राउंडिंगचा सराव करू शकता.
-सर्वप्रथम ओल्या गवतावर चालण्याची सुरुवात करा. कारण ते मऊ असते आणि त्यामुळे तुमच्या पायांना शूजशिवाय चालण्याची सवय लागते.
-हळूहळू सुरुवात करा. दररोज १० मिनिटे हा सराव करा. अचानक जास्त वेळ अनवाणी चालु नका. दुखापत होण्याचा धोका असतो.
-फक्त स्वच्छ ठिकाणी अनवाणी चालावे. चपलाशिवाय अस्वच्छ ठिकाणी चालल्याने संसर्ग होण्याचा धोका असतो.
-तुमचे पाय मजबूत करण्यासाठी, दररोज व्यायाम करा जेणेकरून तुमच्या पायांचे स्नायू मजबूत होतील आणि अनवाणी चालण्यास मदत होईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)