weight loss: युट्यूबरने घटवलं तब्बल ५० किलो वजन, नेमकं काय केलं एकदा वाचाच-fitness tips how youtuber tanmay bhatt lost 50 kgs ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  weight loss: युट्यूबरने घटवलं तब्बल ५० किलो वजन, नेमकं काय केलं एकदा वाचाच

weight loss: युट्यूबरने घटवलं तब्बल ५० किलो वजन, नेमकं काय केलं एकदा वाचाच

Aug 25, 2024 02:39 PM IST

युट्यूबर आणि कॉमेडियन तन्मय भट्टचा वजन कमी करण्याचा प्रवास सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. जवळपास 50 किलो वजन कमी करून त्याने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

युट्यूबर आणि कॉमेडियन तन्मय भट्टचा वजन कमी करण्याचा प्रवास
युट्यूबर आणि कॉमेडियन तन्मय भट्टचा वजन कमी करण्याचा प्रवास (instagram)

लठ्ठ लोकांना वजन कमी करणं अवघड जातं, अनेकांना वजन कमी करण्याच्या प्रवासात नैराश्य येऊ लागते. परंतु एका युट्युबरने चक्क ५० किलो वजन कमी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. तुम्हालाही वजन कमी करायचे आहे तर वाचा या युट्यूबरचा वजन कमी करण्याचा प्रवास. ज्यांने आपलं वजन जवळपास 50 किलोपर्यंत कमी केलं. युट्यूबर तन्मय भट्टचा वजन कमी करण्याचा प्रवास सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून एक्सवर त्याचे पॉडकास्टही आहेत . ज्यात तो आपल्या नियमित दिनचर्येविषयी सांगताना दिसत आहे. योग्य आहार आणि नियमित व्यायामाच्या मदतीने वजन झपाट्याने कमी करता येते. पॉडकास्टमध्ये, यूट्यूबरने वजन कमी करणे कसे सोपे झाले हे सांगितलेआहे.

कोणतेही काम करण्यासाठी नियमितता असणे आवश्यक आहे. कोणालाही दोष देण्यापेक्षा स्वत:साठी वेळ काढावा. तन्मय रोज सकाळी ५ ते संध्याकाळी ७.३० या वेळेत वर्कआऊट करतो. दररोज तो अडीच तास देऊन व्यायाम करतो. जेणेकरून फिटनेसवर लक्ष केंद्रित करता येईल . वजन कमी करणारे प्रशिक्षक सांगतात की, जर तुम्ही दररोज 20 मिनिटे व्यायाम केला तर तुम्ही फिट राहू शकता. आठवड्यातून ३-४ वेळा व्यायाम आणि मैदानी खेळ खेळल्यास निरोगी राहण्यास मदत होईल.

वजन कमी करण्यासाठी फिटनेस ट्रेनर राजपूत टिप्स देतात की कोणतीही नवीन जीवनशैली सेट करण्यास वेळ लागू शकतो. पण वर्कआउट रूटीन चुकणार नाही यासाठी जवळपास महिनाभर प्रयत्न करत राहा. महिनाभर सतत प्रयत्न केल्यानंतर त्याचा आपल्या रुटीनमध्ये समावेश होईल.

जीवनशैलीतील बदल महत्वाचे

तन्मय सांगतो की, 2022 साली त्याने जिममध्ये जाण्यास सुरुवात केली. पण जिममध्ये जाणं, हेल्दी फूड आणि लाईफस्टाईलमध्ये बदल करणं यामुळे तो कंटाळून गेला. त्यानंतर तो बॅडमिंटन खेळू लागला. सलग तीन ते चार महिने बॅडमिंटन खेळल्याने वजन कमी होण्यास मदत झाली आणि मग त्याच वेळी वेट लिफ्टिंगला सुरुवात झाली. ज्यामुळे वजन कमी करणे सोपे झाले.

2022 मध्ये यूट्यूबर तन्मय भट्टचे वजन 168 किलो च्या आसपास होते. जे त्याने यावेळी ११३ किलोपर्यंत कमी केले आहे. हा रूटीन फॉलो करून त्याने जवळपास 55 किलो वजन कमी केलं आहे.

योग्य सवय अंगिकारण्यास सुरुवात करा.

नुसता विचार न करता त्यावर काम करणे सुरू करा. वर्कआऊट सुरू करा आणि ते नियमितपणे करा.

जास्त कडक फिटनेस रुटीन फॉलो करण्याऐवजी, जे आपल्याला आनंदी ठेवते आणि तंदुरुस्त राहण्यास देखील मदत करते ते करा.