Fitness Mantra: पोटाची ढेरी वाढलीय, फिटिंगचे कपडेच घालता येत नाहीत? 'या' व्यायामाने भराभर वितळेल चरबी-fitness tips easy exercises to do at home to reduce belly fat ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Fitness Mantra: पोटाची ढेरी वाढलीय, फिटिंगचे कपडेच घालता येत नाहीत? 'या' व्यायामाने भराभर वितळेल चरबी

Fitness Mantra: पोटाची ढेरी वाढलीय, फिटिंगचे कपडेच घालता येत नाहीत? 'या' व्यायामाने भराभर वितळेल चरबी

Sep 11, 2024 08:40 AM IST

Exercise to lose belly: दिवसभराच्या धावपळीत महिलांना व्यायामासाठी वेळच मिळत नाही. अशा परिस्थितीत वजन वाढण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो आणि पोटाभोवती चरबी जमा होऊ लागते.

Exercise to lose belly- पोटाची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम
Exercise to lose belly- पोटाची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम (pexel)

Easy exercises for women:  डाएटिंग किंवा डाएट प्लॅन फॉलो करण्यासोबतच शारीरिक हालचालीदेखील पोटावर जमा झालेली चरबी कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, दिवसभराच्या धावपळीत महिलांना व्यायामासाठी वेळच मिळत नाही. अशा परिस्थितीत वजन वाढण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो आणि पोटाभोवती चरबी जमा होऊ लागते.

पोट आणि नितंबांवर जमा झालेली चरबी काढून टाकण्यासाठी नियमित व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. अनेकदा स्त्रिया अशा व्यायामाच्या शोधात असतात ज्यामुळे कमी वेळेत वजन वाढण्याची समस्या दूर होऊ शकते. चला जाणून घेऊया असे काही व्यायाम जे दिवसभरात काही मिनिटे केल्याने वजन नियंत्रणात करता येते.

दिवसभर घर आणि ऑफिसच्या कामात समतोल राखण्यात फिटनेससाठी कमी वेळ मिळतो. त्यामुळे वर्कआउट रूटीन अपूर्ण राहते. या संदर्भात फिटनेस ट्रेनर सांगतात की, घरी किंवा बेडरूममध्ये चालताना काही सोप्या व्यायामाच्या मदतीने शरीराचे वजन कमी केले जाऊ शकते. यामुळे कॅलरी बर्न होण्यास मदत होते. १ ते २ मिनिटे एक एक करून सर्व व्यायाम केल्याने पोटाची चरबी कमी होऊ लागते. या व्यायामाचा सराव सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री जेवणानंतर १ तासाने करणे योग्य समजले जाते.

१) रीच फॉर द स्काय-

-यासाठी किचन किंवा बेडरूममध्ये काही वेळ उभे राहून दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवा.

-त्यानंतर उजवा हात वर घेऊन शरीराला वर खेचा आणि नंतर डावा हात वर घ्या.

-यामध्ये हात वरच्या दिशेने नेताना, पायाची टाचदेखील वर उचला. ३ ते ५ मिनिटे हा सोपा व्यायाम केल्याने शरीरातील ऊर्जा पातळी वाढू लागते.

२) साइड क्रंच लेग लिफ्ट-

- यासाठी चटईवर उभे राहून दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आता आपले हात कोपरापासून वाकवून डोक्याजवळ घ्या.

-आता हळूहळू शरीर उजवीकडे वाकवा आणि मग सरळ व्हा. त्यानंतर, आपले हात सरळ करा आणि उजव्या बाजूला वाकून उजवा पाय वर उचला.

-यानंतर, शरीर डावीकडे वाकवा. दिवसातून ३ ते ५ मिनिटे हा व्यायाम केल्याने लव हँडल्स म्हणजेच कंबरेवर जमा झालेली चरबी कमी करता येते.

३)हील वॉक-

-यासाठी दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवा आणि दोन्ही हात एकत्र धरा.

-यानंतर, १० ते २० पावले आपल्या टाचांवर आपल्या घराच्या आत चालत जा आणि नंतर त्याच पद्धतीने परत या.

-हा व्यायाम ३० वेळा १ ते २ मिनिटांसाठी केल्याने नितंबांचे स्नायू मजबूत होतात आणि वजन वेगाने कमी होण्यास मदत होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग