Katrina Kaif Fitness Trainer: कतरिना कैफपासून दीपिका पदुकोणपर्यंत अनेक बॉलिवूड अभिनेत्रींची आवडती फिटनेस ट्रेनर म्हणजे यास्मिन कराचीवाला होय. यास्मिन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर फिटनेससाठी आवश्यक असणारा डाएट आणि वर्कआउटच्या अनेक टिप्स आणि ट्रिक्स शेअर करत असते. ती विविध व्हिडीओजमधून लोकांना प्रेरित करत असते. सोशल मीडियावर तिचे प्रचंड फॉलोअर्स आहेत. आपल्या फॉलोअर्सना ती नेहमीच फिट राहण्याचा सल्ला देत असते.
नुकतंच यास्मिनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने ५ व्यायामाचे प्रकार दाखवले आहेत. जे तुमच्या ओटीपोटाच्या आणि नितंबाच्या आरोग्यासाठी अगदी उत्तम आहेत. या व्यायामामुळे तुमच्या ओटीपोटाला आणि नितंबाला मजबुती मिळते. शिवाय तुमच्या शरीरात एक प्रकारची स्थिरता येते. पायांचे स्नायू बळकट करण्यासाठीसुद्धा हे व्यायाम प्रकार अत्यंत उपयुक्त आहेत. चला तर मग जाणून घेऊया हे कोणते व्यायाम प्रकारे आहेत...
या व्यायामासाठी शरीरापासून ९०-अंशाच्या कोनात पाय मागे टेकून, गुडघ्याला दुमडून पायाचे बोट बाहेरच्या बाजूने ताणून टो टॅप्स करता येतात. त्यानंतर, योगा चटईवर एकेक करून बोटे टॅप करा.फायदे- ओटीपोटाचे आणि नितंबाचे स्नायू मजबूत करते आणि पेल्विक स्थिरता देते. जे दुखापतीपासून बचावासाठी महत्त्वपूर्ण आहे.
यासाठी योगा चटईवर झोपून नंतर शरीरापासून 90-अंशाच्या कोनात पाय ताणून सिंगल लेग स्ट्रेच करता येते. त्यानंतर, पाय बदलून डोक्याच्या दिशेने पाय ताणून धरा.फायदे- पायांच्या स्नायूंनां मजबुती देते. पेल्विक स्थिरता सुधारते आणि एकंदरीत संपूर्ण शरीराला मजबुती देते.
डबल लेग स्ट्रेच म्हणजेच दोन्ही पायांना स्ट्रेच केल्यामुळे पोटाच्या वरच्या आणि खालच्या भागासह संपूर्ण कोर मजबूत होण्यास मदत होते.फायदे- हा व्यायाम केल्याने स्नायूंचे समन्वय वाढण्यास आणि श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवण्यास देखील मदत होते.
कॉर्कस्क्रू ही इतर व्यायमाच्या तुलनेने कमी दर्जाचा प्रकार आहे. परंतु तिरक्या आणि खोल कोर स्नायूंना लक्ष्य करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.फायदे- हे पाठीचा कणा मजबूत करण्यास आणि पायांची स्थिरता वाढविण्यात देखील मदत करते.
हा व्यायाम सर्वात मजेदार व्यायामांपैकी एक आहे. यामध्ये बॉलसारखे रोलिंग ओटीपोटाच्या आणि नितंबाच्या स्नायूंना बळकट करण्यात मदत करू शकते. फायदे- शरीराचे नियंत्रण राखण्यासाठी ओटीपोटाच्या आणि पाठीच्या स्नायूंना गुंतवून ठेवते. पाठीच्या स्नायूंना बळकट करून शरीराचा समतोल राखण्यास मदत करते.