Habits To Stay Fit: फिट राहण्यासाठी निरोगी आहारासोबतच व्यायाम करणे सुद्धा आवश्यक आहे. पण काही लोकांना हिवाळ्यात व्यायाम करणे अवघड वाटते. थंडीमुळे सकाळी व्यायाम करण्याचा कंटाळा येतो. पण तुम्हाला माहिती आहे का की फिट राहण्यासाठी तुम्ही काही सवयी अंगीकारल्या तर तुम्हाला वर्कआउट करण्याची गरज भासणार नाही. या सवयी अशा लोकांसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे ज्यांना व्यायाम करायला पुरेसा वेळ मिळत नाही. चला तर मग जाणून घ्या या सवयी कोणत्या आहेत.
फिट राहण्यासाठी सक्रिय राहणे महत्त्वाचे आहे. जर तुमच्याकडे व्यायामासाठी वेळ नसेल किंवा थंडीत व्यायाम करणे कठीण होत असेल तर स्वत:ला व्यस्त ठेवून फिट राहा. यासाठी तुम्ही काही घरगुती कामे करू शकता. किंवा तुम्ही थोडा वेळ घरातच वॉक करू शकता. जर तुम्हाला डान्स करायला आवडत असेल तर तुम्ही थोडा वेळ डान्स सुद्धा करू शकता.
जर तुम्हाला दिवसभर सक्रिय राहायचे असेल तर रात्रीची झोप सर्वात महत्वाची आहे. दररोज ७-८ तास झोपणे आवश्यक आहे. असे झाले नाही तर तुमच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
फिटनेससाठी सकस आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे. आहारातून अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळवण्याचा प्रयत्न करा. सकस आहार मानसिक आरोग्यासाठी सुद्धा चांगला आहे. यासोबतच एकंदर तंदुरुस्तीसाठी देखील ते महत्त्वाचे आहे.
चांगले संगीत शरीरात हॅपी हार्मोन्स सोडण्यास मदत करते. हे तणाव आणि नैराश्याची लक्षणे कमी करते. तुम्ही तुमच्या आवडीची गाणी ऐकलीत तर तुमचा मूड आणखी चांगला होऊ शकतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या