Belly Fat Exercise for Women: कंबरेजवळ आणि पोटाजवळ जमा झालेली चरबी नुसतीच खराब दिसत नाही तर ती आरोग्यालाही धोका निर्माण करते. कंबरेच्या जास्त आकारामुळे मधुमेह आणि हृदयाचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत व्यायाम हा एक मार्ग आहे जो तुम्हाला हेल्दी आणि फिट राहण्यास मदत करतो. लहान वयात थोडे अवघड व्यायाम करून वजन सहज कमी करता येते. पण जर वय ३५ वर्षपेक्षा अधिक असेल तर व्यायाम करताना काळजी घ्यावे लागते. अशावेळी महिला भिंतीचा आधार घेऊन काही व्यायाम करू शकतात. हे व्यायाम केल्याने कंबर आणि पोटाची चरबी लवकर कमी होईल. जाणून घ्या भिंतीचा आधार घेऊन कोणते व्यायाम करता येतात.
सर्वप्रथम एखाद्या रिकाम्या भिंतीकडे तोंड करून उभे रहा. दोन्ही हात वर करा आणि तळवे भिंतीवर ठेवा. आता एक एक करून दोन्ही पाय गुडघ्यापर्यंत वाकवून वरच्या दिशेने घ्या. हे व्यायाम दररोज २०-३० वेळा दोन ते तीन सेटमध्ये केल्याने ४० वर्षांनंतर वाढणारी पोटाची चरबी कमी होण्यास मदत होईल.
प्लँक व्यायामामुळे शरीराचा समतोल तर राहतोच पण पोटाची चरबी कमी होण्यासही मदत होते. दोन्ही पाय भिंतीवर टेकवा आणि प्लँक एक्सरसाइज करा. यामुळे बॉडी पोश्चर सुधारण्यास मदत होईल.
भिंतीपासून एक फूट अंतरावर भिंतीकडे पाठ करून उभे राहा. आता कंबरेपासून वाकून दोन्ही हात भिंतीवर ठेवा. त्याचप्रमाणे डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूंनी फिरा. दररोज किमान २० ट्विस्टचे दोन ते तीन सेट केल्याने कंबरेची चरबी कमी होण्यास मदत होईल.
दोन्ही पाय भिंतीवर टेकून झोपा. पाय खांद्याला समांतर ठेवा. भिंतीवर पुश करताना दोन्ही हात वर करा आणि उठा. या क्रंचमुळे पोटाच्या स्नायूंवर दबाव येईल आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होईल
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या