Benefits of Aerobic Step Exercise: वजन कमी करण्यासाठी असो किंवा आजारांना दूर ठेवण्यासाठी रोजच्या दिनचर्येत व्यायामाचा समावेश केला पाहिजे. एरोबिक स्टेप एक्सरसाइज हा अशा व्यायामांपैकी एक आहे जो संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे वजन कमी करण्यास आणि हृदयाचे आरोग्य वाढवण्यास तसेच फुफ्फुसाची क्षमता वाढविण्यास मदत करते. याशिवाय तुमच्या वर्कआउट रुटीनमध्ये याचा समावेश केल्याने तुमचे मेटाबॉलिझम वाढू शकते. चला तर जाणून घ्या एरोबिक स्टेप एक्सरसाइज केल्याने कोणते फायदे मिळतात.
एरोबिक स्टेप एक्सरसाइज हा एक चांगला कार्डियोवस्कुलर व्यायाम आहे, जो तुमचे हृदय मजबूत करण्यास मदत करतो. दररोज एरोबिक स्टेपर वर्कआउट वजन कमी करण्यास मदत करते, रक्तदाब कमी करते आणि तुमचे ओव्हरऑल हार्ट हेल्थ नियंत्रणात ठेवते.
एरोबिक स्टेप व्यायामामुळे तुमच्या शरीरातील प्रत्येक स्नायू टोन होण्यास मदत होते. हे तुमच्या खालच्या शरीरात म्हणजे मांड्या आणि वासरे यांचे स्नायू तयार करण्यात मदत करते.
हा एक उत्कृष्ट व्यायाम आहे. फॅट बर्न करणे आणि तुमचे हृदय मजबूत करण्यासाठी तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये एरोबिक स्टेप एक्सरसाइज समाविष्ट करू शकता. याव्यतिरिक्त स्टेप एरोबिक्स मधुमेह आणि रक्तदाब व्यवस्थापित करण्यात मदत करते.
एरोबिक स्टेप व्यायामामुळे तुमच्या शरीराच्या वरच्या भागाची, पायांची आणि कोअरची लवचिकता आणि ताकद सुधारते. हा व्यायाम रुटीनमध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो.
या व्यायामाने शरीर सुडौल व आकर्षक दिसू लागते. यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते. हा व्यायाम रोज केल्याने जुनाट आजारांची लक्षणे कमी होऊ शकतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या