7 Days Weight Loss Diet Plan: फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हटला जातो. व्हॅलेंटाईन डे प्रमाणेच त्यापूर्वी एक आठवडा हा व्हॅलेंटाईन वीक म्हणून साजरा केला जातो. या आठवड्यात रोझ डे, प्रपोज डे असे विविध दिवस साजरे केले जातात. या काळात बहुतेक लोक आपल्या पार्टनरसोबत फिरायला जातात. अशा परिस्थितीत कपल्सना आपण परफेक्ट दिसावे असे वाटते. तुम्हाला सुद्धा व्हॅलेंटाइन डेच्या आधी वजन कमी करायचे असेल तर तुम्ही डिटॉक्स डाएट (detox diet) फॉलो करू शकता. डिटॉक्स डायट शरीराला आतून शुद्ध करण्यास आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करेल. जेव्हा शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकले जातात तेव्हा पचन आणि चयापचय वाढवता येते. याच्या मदतीने वजन कमी करण्यास मदत होते. चला तर मग जाणून घ्या वजन कमी करण्यासाठी ७ दिवसांसाठी डिटॉक्स डायट प्लॅन.
एक कप पाण्यात मेथीचे दाणे घालून उकळवा. नंतर त्यात एक चमचा लिंबाचा रस घाला. हे ड्रिंक सकाळी प्या.
एक कप पाण्यात १ टेबलस्पून ओट्स, १ केळी, १ टेबलस्पून फ्लेक्स सीड्स, ४-५ ब्लूबेरी आणि १ टेबलस्पून मध घाला. नंतर ते मिक्स करा आणि स्मूदी तयार करा. हे तुम्ही ब्रेकफास्टमध्ये प्यावे.
मिक्स नट्स किंवा मिक्स सीड्स किंवा एखादे फळ खाऊ शकता.
भाजलेल्या भाज्यांसोबत शिजवलेले भात आणि उकळलेली डाळ, वरण किंवा भाज्यांसोबत भाजलेले टोफू खा.
ताक आणि भाजलेले हरभरे म्हणजे फुटाणे किंवा नारळ पाणी आणि काकडी घ्या.
ब्रोकोली सूप किंवा मशरूम सूप किंवा चिकन सूप घ्या
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)