Fitness Mantra: सतत खांदे दुखतात का? हे स्ट्रेचिंग एक्सरसाइज केल्याने मिळेल आराम
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Fitness Mantra: सतत खांदे दुखतात का? हे स्ट्रेचिंग एक्सरसाइज केल्याने मिळेल आराम

Fitness Mantra: सतत खांदे दुखतात का? हे स्ट्रेचिंग एक्सरसाइज केल्याने मिळेल आराम

Dec 31, 2023 10:47 AM IST

Shoulder Pain: खांदा आणि त्याच्या आजूबाजूच्या वेदना जाणवत असतील, खांदा दुखत असेल तर तुम्ही हे काही स्ट्रेचिंग इक्सरसाइज करू शकता. तुम्हाला लवकर आराम मिळेल.

खांदेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी स्ट्रेचिंग एक्सरसाइज
खांदेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी स्ट्रेचिंग एक्सरसाइज (unsplash)

Stretch Exercises For Shoulder Pain: शरीरातील एखाद्या भागात होणारी वेदना, कडकपणा जाणवत असले तर ते कमी करण्यासाठी स्ट्रेचिंग एक्सरसाइज मदत करतात. अनेक वेळा खांद्याला दुखापत झाल्यामुळे किंवा चुकीच्या पोश्चरमध्ये झोपल्यामुळे वेदना सुरू होतात. हे दुखणे कमी करण्यासाठी अनेक वेळा लोक पेन किलर घेतात. पेन किलर घेण्यापेक्षा काही स्ट्रेचिंग एक्सरसाइज अधिक प्रभावीपणे कार्य करतात. हे स्ट्रेचिंग एक्सरसाइज केल्याने स्नायूंमधील कडकपणा दूर होतो आणि ते रिलॅक्स होण्यास मदत होते. त्यामुळे खांदेदुखी दूर होते. जर तुमच्या खांद्याजवळच्या स्नायूंमध्ये ताण किंवा गुठळी झाली असेल तर हे स्ट्रेचिंग एक्सरसाइज केल्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा पाणी प्यावे. तसेच हळूहळू व्यायाम करण्याचा प्रयत्न करा.

पोश्चर चेक करा

कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी आरशासमोर उभे राहून आपले पोश्चर चेक करा. पोश्चर चेक करण्यासाठी आपले खांदे वर उचला आणि मागे ढकला. असे केल्याने छातीचा भाग पूर्णपणे टाइट करा आणि मान आणि डोके रिलॅक्स करा. सोबत दीर्घ श्वास घ्या. या पोश्चरमुळे तुम्ही थोडे उंच दिसाल.

आर्म लिफ्ट

उभे राहा आणि तुमचे हात वर करा आणि ते तुमच्या डोक्याच्या मागे ठेवा. यामुळे हात कोपरजवळ वाकतील. आता हात डोक्याच्या मागे ठेवून कोपर मागे दाबा.असे केल्याने तुम्हाला खांद्यावर ताण जाणवेल. सुमारे ५ सेकंद या स्थितीत रहा आणि नंतर सामान्य स्थितीत या.

आर्म लिफ्ट २

याच प्रमाणे हात कंबरेच्या मागे ठेवा आणि कोपर मागे दाबा. यामुळे खांद्यावर पुन्हा ताण जाणवेल. हे दोन्ही व्यायाम प्रत्येकी ५ सेकंदांसाठी करावे लागतात. यासह स्ट्रेचिंगच्या मदतीने खांदा रिलॅक्स केला जातो.

आर्म स्ट्रेच

उभे रहा आणि दोन्ही हात वर करा. लक्षात ठेवा की जेव्हा हात वर जातात तेव्हा तळवे एकमेकांच्या समोर दिसतील. आता शरीराला मागे वाकवा. हा व्यायाम खांद्याच्या स्नायूंना रिलॅक्स करण्यास मदत करेल.

 

आर्म स्ट्रेच २

हा व्यायाम करण्यासाठी झोपा आणि दोन्ही हात डोक्याच्या वर करा. लक्षात ठेवा की या दरम्यान हात कानाजवळ गेले पाहिजेत आणि तळवे एकमेकांच्या समोर असावेत. आता खांदे ताणून ५ - १० मिनिटे थांबा. हे सर्व व्यायाम सुमारे ५ वेळा पुन्हा करा. यामुळे खांद्यामध्ये जडपणा आणि वेदना, खांदे दुखण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner