मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Fitness Mantra: नव्याने व्यायाम सुरु करण्याचा विचार आहे? फॉलो करा या सोप्या टिप्स

Fitness Mantra: नव्याने व्यायाम सुरु करण्याचा विचार आहे? फॉलो करा या सोप्या टिप्स

Jan 31, 2024 10:15 AM IST

Fitness Goal: अनेक वेळा निरोगी राहण्यासाठी डायट आणि व्यायाम करण्याचा विचार केला जातो. पण तुम्ही ते सुरु करू शकत नसाल तर या सोप्या टिप्स ट्राय करा.

व्यायाम सुरु करण्यासाठी सोप्या टिप्स
व्यायाम सुरु करण्यासाठी सोप्या टिप्स (unsplash)

Tips for Beginners to Start Exercise: बरेच लोक निरोगी राहण्यासाठी काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. पण हेल्दी डायट आणि व्यायाम सुरू करण्यास उशीर करतात. कारण व्यायामासाठी नवीन असलेल्या आणि बऱ्याच काळापासून सक्रिय नसलेल्या लोकांना फिटनेस रुटीनचे (fitness routine) पालन करणे कठीण असते. अशा परिस्थितीत व्यायाम हा डेली रुटीनचा भाग बनवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला खरोखरच फिटनेस रूटीन पाळायचे असेल पण ते शक्य होत नसेल तर या छोट्या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमचे फिटनेस गोल (fitness goal) साध्य करू शकता. या सोप्या टिप्सच्या (fitness tips) मदतीने तुम्ही तुमचे फिटनेस रुटीन सहज फॉलो करू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

सोपे व्यायाम करा

दैनंदिन फिटनेस रूटीन फॉलो करण्यापूर्वी आपल्या डेली रुटीनमध्ये साधेआणि सोपे व्यायाम समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. काही मिनिटे स्क्वॅट्स, प्लँक्स आणि दहा मिनिटे जॉगिंग किंवा धावण्याचा प्रयत्न करा.

काय करायचे ते ठरवा

तुमच्या रुटीनमध्ये फिटनेस समाविष्ट करण्यापूर्वी तुम्हाला काय आणि किती करायचे आहे ते ठरवा. फक्त 'मला वजन कमी करायचे आहे' असे म्हणणे पुरेसे नाही. त्यापेक्षा किती महिन्यात किती वजन कमी करायचे हे लक्ष्य निश्चित करा. एक महिन्यात एक किलो वजन कमी करण्यासारखे गोल सेट करा. अशा प्रकारे गोल सेट करा आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.

कोणता व्यायाम करायचा ते ठरवा

वॉकिंग, रनिंग, ब्रीदिंग एक्सरसाइज, एरोबिक्स असे अनेक प्रकारचे व्यायाम आहेत. त्यामुळे शरीराच्या क्षमतेनुसार व्यायाम निश्चित करा. तुम्हाला कोणत्या प्रकारचा व्यायाम करायचा आहे हे नीट ठरवा.

विश्रांतीही महत्त्वाची

जर तुम्ही व्यायाम सुरू केला असेल तर शरीराला विश्रांती देणे सुद्धा महत्त्वाचे आहे. यामुळे तुमच्या शरीर रिलॅक्स फील करते आणि जास्त व्यायामामुळे येणारा ताण दूर होण्यास मदत होते. त्यामुळे व्यायामाच्या मध्ये मध्ये विश्रांती घेणे सुद्धा आवश्यक आहे.

 

सकस आहार

व्यायामासोबतच आहाराकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. नुसता व्यायाम केल्याने फारसा फायदा होणार नाही. पण जर तुम्ही पोषक घटकांनी समृद्ध संतुलित आहार घेतला तर ते लवकर तंदुरुस्त होण्यास मदत होईल. नियमित हेल्दी डायट घ्या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel
विभाग