मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Fitness Mantra: लवकर फॅट बर्न करण्यासाठी करा नियमित हे सोपे व्यायाम, शरीरही होईल स्लिम

Fitness Mantra: लवकर फॅट बर्न करण्यासाठी करा नियमित हे सोपे व्यायाम, शरीरही होईल स्लिम

Jun 24, 2024 09:57 AM IST

Fat Burning Exercise: कोणताही व्यायाम केला तरी बहुतांश लोकांना चरबी कमी करायची असते. अशा वेळी हा सोपा व्यायाम चरबी लवकर बर्न करतो आणि कॅलरी बर्न करतो.

फॅट बर्न करण्यासाठी व्यायाम
फॅट बर्न करण्यासाठी व्यायाम (unsplash)

Simple Exercise to Burn Fat Faster: फिट राहण्यासोबतच बहुतांश लोकांना आपलं शरीर स्लिम करायचं असतं. जर तुम्ही कॅलरी कमी करण्याचा विचार करत असाल ज्याने शरीरातील चरबी देखील कमी होईल तर यासाठी हे काही व्यायाम तुमची मदत करतील. या व्यायामामुळे शरीरातील चरबी झपाट्याने कमी होण्यास मदत होते, असे वर्कआउट ट्रेनरचे मत आहे. तथापि वर्कआउट करण्याचे लेव्हल, वय, वजन आणि उंचीवर सुद्धा फॅट बर्न अवलंबून असते. तरी काही सोपे व्यायाम आहेत ज्याने तुम्ही चरबी लवकर कमी करू शकता. चला तर मग जाणून घ्या असे कोणते व्यायाम केल्याने चरबी लवकर बर्न होते.

ट्रेंडिंग न्यूज

रनिंग

एक्स्पर्टच्या मते, फॅट बर्निंगसाठी धावणे हा उत्तम व्यायाम आहे. एक सरासरी व्यक्ती एक तासाच्या रनिंगमध्ये ५०० ते १००० कॅलरी बर्न करू शकते. मात्र, धावण्याचा वेग, वय याचाही कॅलरी बर्निंगवर परिणाम होतो. पण धावण्याने शरीरातील सर्व स्नायूंचा वापर होतो आणि जास्तीत जास्त कॅलरीज बर्न होतात.

सायकलिंग

कार्डिओ व्यायामात सायकलिंग सर्वोत्तम आहे. एक तास सायकल चालवल्यास ५०० ते ७०० कॅलरीज बर्न होतात. यामुळे गुडघे, हात, पाय यांसह शरीरातील सर्व आवश्यक स्नायूंची चरबी जाळण्यास मदत होते.

प्लँक्स

प्लँक देखील स्नायूंची चरबी वेगाने बर्न करतात. पण केवळ साधेच नव्हे तर वेगवेगळ्या पद्धतीने केलेले प्लँक शरीरावर इफेक्टिव्ह परिणाम करतात.

स्किपिंग किंवा दोरीवरच्या उड्या

दोरीवर उड्या मारल्याने अपर आणि लोअर दोन्ही बॉडी पार्ट्सवर समान परिणाम होतो आणि स्नायूंमधून चरबी वेगाने बर्न होते. दोरीच्या उड्या मारणे हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यासाठी देखील चांगले आहे. इतकंच नाही तर दोरीच्या उड्या मारल्याने मन आणि शरीरात चांगलं संतुलन निर्माण होतं. जे मनाच्या आरोग्यासाठीही चांगले असते. एका तासात ६०० ते १००० कॅलरीज बर्न होऊ शकतात.

पायऱ्या चढणे

जर तुम्ही लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर केला तर तुमचे हृदय मजबूत राहण्यास मदत होते. यामुळे शरीर ही स्लिम होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel
विभाग