मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Fitness Mantra: सकाळी फक्त ७ मिनिटांचा व्यायाम दूर करू शकतो वाढलेले वजन, राहाल फिट

Fitness Mantra: सकाळी फक्त ७ मिनिटांचा व्यायाम दूर करू शकतो वाढलेले वजन, राहाल फिट

Jun 17, 2024 09:46 AM IST

Weight Loss Exercise: जर तुम्ही वाढत्या वजनामुळे त्रस्त असाल आणि व्यायामासाठी वेळ मिळत नसेल तर फिट राहण्यासाठी सकाळी फक्त ७ मिनिटे पुरेशी आहेत. हे व्यायाम करायला सुरुवात करा.

वजन कमी करण्यासाठी ७ मिनिटांचे व्यायाम
वजन कमी करण्यासाठी ७ मिनिटांचे व्यायाम (unsplash)

7 Minutes Exercise for Weight Loss: जर तुम्ही वजन कमी करण्याचा निर्णय घेतला असेल, परंतु वेळेची कमतरतेमुळे तुम्ही व्यायाम सुरु करू शकत नसाल. तर सकाळी फक्त ७ मिनिटं व्यायाम करून तुम्ही तंदुरुस्त राहू शकता. फक्त हे काही व्यायाम करा आणि काही दिवसांतच तुम्हाला तुमच्या शरीरात होणारे बदल सहज दिसू शकतील. रोज सकाळी ७ मिनिटे घरात कुठेही उभे राहून हे व्यायाम करा. हे तुमचे वजन कमी करण्यास आणि फिट राहण्यास मदत करतील. ७ मिनिटात हे ६ व्यायाम करा

जंपिंग जॅक

लहानपणी तुम्ही हा व्यायाम खूप केला असेल. जर तुम्हाला तुमची फिटनेस जर्नी सुरू करायची असेल तर यापासून सुरुवात करा. पाय पसरून उभे राहा आणि हात वरच्या दिशेने उंचवा. मग उडी मारून पाय एकत्र ठेवून हात खाली आणा. हीच प्रक्रिया पुन्हा पुन्हा करा. हात वर नेताना पाय पसरवा आणि खाली येताना एकत्र आणा. फक्त ३० सेकंदात फास्ट करा किंवा जास्त वजन असल्यास हळूहळू करा.

ट्रेंडिंग न्यूज

वॉल सिट्स

हे तुम्हाला फिटनेस रूटीन सुरू करण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करेल. भिंतीला आधार देऊन गुडघे ९० अंशावर वाकवून खुर्चीवर बसण्यासारखी पोज द्या. या स्थितीत ३० सेकंद थांबा आणि नंतर उभे राहा. एकदा व्यायाम सुरू केल्यावर तुम्ही वेळ आणि पुनरावृत्ती वाढवू शकता.

पुशअप्स

प्लँक पोझिशनमध्ये या आणि नंतर कोपरांवरून हात वाकवून शरीराला जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा आणि नंतर उचलण्याचा प्रयत्न करा. पुशअप्स सोपे करण्यासाठी सुरुवातीला गुडघे जमिनीवर टेकवून पुशअप्स करा. यामुळे पुशअप सुरू करणे सोपे जाते. मग हळूहळू तुमची लेव्हल वाढवा.

स्टेप अप

एखादी खुर्ची किंवा शिडीच्या पायरीवर दोन्ही पाय वारंवार ठेवून वर जा आणि खाली उतरा. हा स्टेप अप व्यायाम दोन्ही पायांनी करा.

स्क्वॅट

स्क्वॅट व्यायाम ३० सेकंदात करा. पायावर उभे रहा आणि खांदे आणि पाय समान अंतरावर ठेवा. आता गुडघे ९० अंशावर वाकवून मग उभे राहा. जसे तुम्ही खुर्चीवर बसत आहात अशा स्थितीत उभे राहिले पाहिजे.

हाय नी

एकाच जागी उभे राहून धावा. या दरम्यान गुडघे शक्य तितके छातीवर किंवा पोटाजवळ आणण्याचा प्रयत्न करा. हा व्यायाम ३० सेकंद करा. हे अधिक प्रभावी मार्गाने करण्यासाठी हात पसरवा आणि त्यांना कमरेजवळ ठेवा. उडी मारताना गुडघ्याच्या तळहाताला स्पर्श करा. यामुळे वेगाने वजन कमी होण्यास आणि ताकद वाढण्यास मदत होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel