मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Fitness Mantra: वर्कआउटनंतर आहारात करा या २ पोषक घटकांचा समावेश, मिळेल फायदा

Fitness Mantra: वर्कआउटनंतर आहारात करा या २ पोषक घटकांचा समावेश, मिळेल फायदा

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 14, 2024 10:35 AM IST

Diet Tips: जर तुम्ही फिट राहण्यासाठी व्यायाम करत असाल तर व्यायामानंतर काय खावे हे जाणून घेणे सुद्धा आवश्यक आहे. आवश्यक पोषक असलेले अन्न खाल्ल्याने शरीराला थकवा जाणवत नाही आणि ऊर्जा राहते.

वर्कआउट नंतरचे आहार
वर्कआउट नंतरचे आहार (unsplash)

Post Workout Food: निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी ज्याप्रमाणे व्यायाम करणे महत्त्वाचे आहे, त्याचप्रमाणे योग्य खाण्याच्या सवयीही महत्त्वाच्या आहेत. विशेषत: जेव्हा तुम्ही डेली रूटीनमध्ये वर्कआउट करता, तेव्हा योग्य अन्न खाणे महत्त्वाचे असते. व्यायामामुळे स्नायू ग्लायकोजन वापरतात. त्यामुळे त्यांना ऊर्जा मिळते. याशिवाय स्नायूंमध्ये असलेली प्रथिने देखील तुटतात. अशा परिस्थितीत शरीराला पुन्हा ग्लायकोजेन संचयित करणे आवश्यक आहे आणि मसल्स प्रोटीन देखील पुन्हा तयार केली जातात. जेव्हा तुम्ही योग्य पोषक घटक खातात तेव्हा ते तुमच्या स्नायूंना पुन्हा ऊर्जा मिळण्यास आणि रिपेअर करण्यास मदत करते. म्हणून या पोषक घटकांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.

वर्कआउटनंतर आवश्यक न्यूट्रिशन

प्रथिने

कार्बोहायड्रेट आणि फॅट

या दोन गोष्टींचे योग्य मिश्रण शरीराच्या स्नायूंना हेवी वर्कआउटनंतर बरे होण्यासाठी आवश्यक आहे.

प्रोटीन मसल्स तयार करण्यास आणि दुरुस्त करण्यास मदत करतात

हेवी वर्कआउट केल्यानंतर प्रथिनांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. जेणेकरून शरीराला अमिनो अॅसिड मिळू शकेल आणि स्नायूंमध्ये पुन्हा प्रोटीन तयार होऊ शकेल. दिवसभरात ३ ते ४ तासांच्या अंतराने आपल्या वजनानुसार साधारण २० ते ४० ग्रॅम प्रथिने दररोज घेतले पाहिजे.

कार्बोहायड्रेट देखील आहेत आवश्यक

हेवी वर्कआउट नंतर स्नायूंना बरे होण्यासाठी कार्ब देखील आवश्यक असतात. कर्बोदकांचे प्रमाण व्यायामाच्या प्रकारावर अवलंबून असते. उदाहरणार्थ जर तुम्ही रनिंग किंवा स्विमिंग करत असाल तर तुम्हाला वेट लिफ्टिंगच्या तुलनेत अधिक कार्ब्सची आवश्यकता असते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel