मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Fitness Mantra: हिप्सवर जमा झालेली चरबी लूक खराब करतेय? टोन्ड स्लिम पायांसाठी करा हे व्यायाम

Fitness Mantra: हिप्सवर जमा झालेली चरबी लूक खराब करतेय? टोन्ड स्लिम पायांसाठी करा हे व्यायाम

Jan 29, 2024 11:03 AM IST

Hip Fat Loss: जर तुमच्या हिप्सवर चरबी जमा झाली असेल आणि तुम्हाला पुन्हा टोन्ड आणि स्लिम पाय हवे असतील तर तुमच्या रूटीनमध्ये या व्यायामांचा समावेश करा.

हिप्सवरील चरबी कमी करण्यासाठी व्यायाम
हिप्सवरील चरबी कमी करण्यासाठी व्यायाम (unsplash)

Exercise To Reduce Hip Fat: खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, शारीरिक हालचालींचा अभाव आणि अनियंत्रित जीवनशैलीमुळे बहुतेक लोकांना वाढत्या लठ्ठपणाची समस्या होत आहे. ही समस्या स्त्रियांसाठी अधिक त्रासदायक बनते जेव्हा त्यांना त्यांच्या हेवी मांड्या आणि हिप्समुळे त्यांचा आवडता शॉर्ट ड्रेस घालता येत नाही. तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या समस्येने त्रस्त असाल आणि तुम्ही टोन्ड आणि स्लिम पायांचे स्वप्न पाहत असाल तर काळजी करू नका. या दोन व्यायामांना तुमच्या रुटीनचा एक भाग बनवा. या व्यायामामुळे हिप्स फॅट लवकर निघून जाण्यास मदत होते.

ट्रेंडिंग न्यूज

ब्रिज एक्सरसाइज

हिप्सवरील फॅट कमी करण्यासाठी ब्रिज एक्सरसाइज हा अतिशय प्रभावी वर्कआउट मानला जातो. या व्यायामामुळे हिप्सच्या खालचा भाग ताणला जातो आणि मांड्यांमधील वाढती चरबी, पाठदुखी आणि पाठीचा कडकपणा यापासून आराम मिळतो. ब्रिज एक्सरसाइज करण्यासाठी सर्वप्रथम पाठीवर झोपा, गुडघे वाकवा आणि हात शरीराच्या बाजूला सरळ ठेवा. आता हळू हळू आपले नितंब वर उचलताना आपल्या हातांनी घोट्याला धरण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही हे करू शकत नसाल तर फक्त बाजूला हात ठेवा. थोडा वेळ या स्थितीत राहा आणि नंतर पहिल्या स्थितीत परत या.

साइड लेग एक्सरसाइज

हिप्सची चरबी कमी करण्यासाठी साइड लेग एक्सरसाइज सर्वोत्तम मानली जाते. अगदी प्लस साइजच्या महिलाही साइड लेग एक्सरसाइज सहज करू शकतात. हा व्यायाम करणे खूप सोपे आहे. हा व्यायाम हिप्सची चरबी कमी करण्यासोबतच कंबरेची चरबी कमी करण्यास मदत करतो. हा व्यायाम करण्यासाठी प्रथम योगा मॅटवर सरळ झोपा आणि एका बाजूला वळवा. यानंतर आपले दोन्ही पाय एकमेकांच्या वर ठेवून आपले पाय एका बाजूला वरपासून खालपर्यंत आणि उजवीकडून डावीकडे हलवा. ही प्रक्रिया दुसऱ्या पायाने आणि अने वेळा पुन्हा करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel
विभाग