मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Fitness Mantra: लटकलेले पोट आकारात ठेवण्यासाठी रोज करा रशियन ट्विस्ट एक्सरसाइज, ही आहे करण्याची योग्य पद्धत

Fitness Mantra: लटकलेले पोट आकारात ठेवण्यासाठी रोज करा रशियन ट्विस्ट एक्सरसाइज, ही आहे करण्याची योग्य पद्धत

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 06, 2024 08:40 AM IST

Weight Loss Exercise: जर तुमच्या सिटिंग जॉब किंवा बैठी जीवनशैलीमुळे तुमच्या पोटाभोवती चरबी जमा झाली असेल आणि तुम्हाला ते कमी करून पुन्हा आकार आणायचे असेल तर तुमच्या रुटीनमध्ये या व्यायामाचा समावेश करा.

रशियन ट्विस्ट एक्सरसाइज
रशियन ट्विस्ट एक्सरसाइज

Russian Twist Exercise to Lose Belly Fat: जर तुमच्या सुटलेल्या पोटामुळे तुम्ही तुमचा आवडता ड्रेस घालण्यास टाळाटाळ करत असाल, घराबाहेर पडणे देखील तुम्हाला आवडत नसेल, तर रशियन ट्विस्ट एक्सरसाइज समस्या सोडवू शकतो. आज वाढते वजन आणि शरीरावर जमा होणारी अतिरिक्त चरबी हे बहुतेक लोकांसाठी त्रासाचे प्रमुख कारण बनले आहे. वाढत्या लठ्ठपणामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास तर कमी होतोच पण इतर अनेक आजारांनाही निमंत्रण दिले जाते. तुमच्या बैठ्या कामामुळे किंवा बैठी जीवनशैलीमुळे तुमच्या पोटाभोवती चरबी जमा झाली असेल आणि तुम्हाला पोटाची ही लटकणारी चरबी कमी करून तुम्हाला पुन्हा शेपमध्ये यायचे असेल तर रशियन ट्विस्ट एक्सरसाइजचा आपल्या रुटीनमध्ये समावेश करा. चला जाणून घेऊया हा व्यायाम करण्याची योग्य पद्धत कोणती आहे.

सुटलेले पोट परत आकारात आणण्यासाठी अशा प्रकारे करा रशियन ट्विस्ट एक्सरसाइज (Russian Twist Exercise)

रशियन ट्विस्ट एक्सरसाइज करण्यासाठी सर्वप्रथम जमिनीवर आरामात झोपा. तुमचे पाय गुडघ्यापासून थोडेसे वाकवा आणि तुमचे हात जमिनीच्या जवळ ठेवा. आता तुमचे शरीर आणि पाय जमिनीपासून वर उचला जेणेकरून तुमचे पाय आणि मांड्या यांच्यामध्ये ४५ अंशाचा कोन तयार होईल. हे करत असताना शरीराचा समतोल राखण्यासाठी पाय जमिनीवर टेकून ठेवा. आता तुमच्या हातात एक बॉल घ्या आणि तुमचे हात तुमच्या समोर घ्या. हे करत असताना हळू हळू श्वास घ्या आणि आपले हात आणि धड डावीकडे वळवा आणि काही सेकंद या स्थितीत रहा. आता हळूहळू सुरुवातीच्या स्थितीत परत येत असताना तोंडातून श्वास सोडा. 

यानंतर आता त्याच पद्धतीने तुमचे हात आणि धड दुसऱ्या बाजूला म्हणजे उजवीकडे फिरवा. हा व्यायाम १० ते २० वेळा पुन्हा करा. नियमित केल्याने पोटाची चरबी कमी होईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग