Fitness Mantra: पावसाळ्यात आजारांपासून राहायचं असेल दूर तर अशा प्रकारे करा स्वतःला तयार!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Fitness Mantra: पावसाळ्यात आजारांपासून राहायचं असेल दूर तर अशा प्रकारे करा स्वतःला तयार!

Fitness Mantra: पावसाळ्यात आजारांपासून राहायचं असेल दूर तर अशा प्रकारे करा स्वतःला तयार!

Jul 09, 2024 10:21 AM IST

Monsoon Fitness Tips: पावसाळ्याला सुरुवात झाली की आजार देखील झपाट्याने वाढू लागतात. या काळात फिट राहायचे असेल तर काही टिप्स फॉलो करा.

पावसाळ्यात फिट राहण्यासाठी टिप्स
पावसाळ्यात फिट राहण्यासाठी टिप्स (unsplash)

Tips To Stay Fit in Monsoon: पावसाळा म्हटलं की आल्हाददायक वातावरणासोबतच विविध आजारांचा प्रादुर्भाव वाढू लागतो. रोज बदलणारे तापमान, अतिवृष्टी याचा आरोग्यावर परिणाम होतो. या काळात संसर्गजन्य आजार झपाट्याने पसरतात. फंगल इंफेक्शनचा धोका तर सर्वाधिक असतो. शिवाय ज्या लोकांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते ते हंगामी आजार, संसर्गजन्य आजारांना लगेच बळी पडतात. या काळात आजारांपासून दूर राहण्यासाठी, फिट राहण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक आहे. यासाठी आधीच स्वतःला तयार करा. पावसाळ्यात फिट राहण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्या ते जाणून घ्या.

लवंग आणि काळी मिरी

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काढा पिणे फायदेशीर आहे हे प्रत्येकाला माहीत आहे. पावसाळ्याच्या दिवसातही त्याचा आहारात समावेश करा. लवंग, काळी मिरी, दालचिनी आणि तुळस यापासून बनवलेला काढा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हा काढा घेतल्याने घसादुखीपासून आराम मिळतो. त्याचबरोबर आजारांशी लढण्यास मदत होते.

सोबत ठेवा कोमट पाणी

पावसाळ्यात दूषित पाणी प्यायल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. हे टाळण्यासाठी पाणी उकळून गाळून घ्या आणि कोमट झाल्यावर प्या. रोज सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. तसेच घसादुखीपासूनही आराम मिळतो. त्यामुळे पावसाळ्यात कोमट पाणी प्यावे.

फळं खा

पावसाळ्यात फळे खाणे खूप फायदेशीर ठरते. ज्या फळांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे ती फळे आवर्जून खा. तुम्ही मोसमी, संत्री, आलूबुखारा, पीच अशी फळे खाऊ शकता. ही आंबट-गोड फळे तुमची रोगप्रतिकार शक्ती बर्‍याच प्रमाणात मजबूत करू शकतात. तसेच तुम्हाला आजारांपासून दूर ठेवू शकतात.

हळदीचे दूध प्या

रोज रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्याने अनेक फायदे होतात. रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी हळद खूप फायदेशीर मानली जाते. दुधात चिमूटभर हळद टाकून हे रात्री प्यायल्याने शरीराचा थकवा कमी होतो आणि चांगली झोप लागते. शिवाय अनेक आजार आपल्यापासून दूर राहतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner