Fitness Mantra In Marathi For weight Loss: वजन कमी करण्यासाठी लोक अनेकदा धडपड करत असतात. पण, आपल्या रोजच्या आयुष्यात अगदी छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली, तर वजन कमी करणं अजिबात अवघड नसतं. तसेच, या गोष्टी केल्यानं वजनही नियंत्रित ठेवता येते. दररोज सकाळी चालणे अतिशय गरजेचे आहे. मॉर्निंग वॉकच्या मदतीने वजन कमी करता येते. पण, दैनंदिन दिनचर्येत त्याचा समावेश करणे बहुतांश लोकांना अवघड वाटते. अशावेळी रोजच्या रुटीनमध्ये वॉकचा समावेश करण्यासाठी कोणती पद्धत अवलंबावी? असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो.
यावर आता एका फिटनेस कोचने उत्तर देत सोपा उपाय सांगितला आहे. फिटनेस प्रशिक्षक अभि राजपूत यांनी सोशल मीडियावर काही टिप्स शेअर केल्या आहेत. ज्यामध्ये काही सोपी कामे केल्याने त्यांच्या मदतीने रोजचे साधे चालणे आणि मॉर्निंग वॉकचा रुटीनमध्ये नक्की समावेश करता येईल. चला तर, जाणून घेऊया या खास टिप्स…
शरीरावर अतिरिक्त चरबी साठल्यास किंवा वजन वाढल्यास लठ्ठपणा येतो. अशावेळी सकाळचा हा रुटीन फॉलो केल्यास वजन नक्कीच लवकर कमी होईल. जाणून घ्या या रुटीनबद्दल…
> सकाळी उठल्यानंतर शरीरात हालचाल आवश्यक असते. सकाळी उठून शारीरिक श्रमाची कामे करावीत. किंवा व्यायामाच्या दृष्टीकोनातून हालचाली कराव्यात.
> सकाळी ९ वाजण्याच्या आधी ४-५ हजार पावले चालण्याचे उद्दिष्ट ठेवा. हे आपल्याला सक्रिय राहण्यास मदत करेलच, पण मनालाही तजेला देईल. ही सवय तुम्हाला रोजच्या कामात आणखी उत्साह देण्याचे काम करेल.
> जर तुम्हाला सकाळी चालण्याचा हा व्यायाम करता येत नसेल, तर अंथरुणावरून उठताच किमान १ हजार पावले चालण्याचा प्रयत्न करा. हळूहळू ही सवय वाढवा. त्यानंतरच इतर कामे करण्यास सुरुवात करा.
> सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा.
> अंथरुणावरून उठताच पाणी प्या.
> यानंतर बाहेर फिरायला जा.
> चालताना लांब श्वास घेण्याचा सराव करा. याचा परिणाम केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक आरोग्यावरही होणार आहे.
> सकाळी उठल्यानंतर पहिला एक तास तरी सोशल मीडियाचा अजिबात वापर करू नका.
> सकाळच्या रुटीनमध्ये या सवयींचा समावेश केल्यास हळूहळू मॉर्निंग वॉकची सवय होईल आणि लठ्ठपणा कमी करणे सोपे जाईल. तसेच वजनही नियंत्रणात राहील.