Stretching Exercises: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी लोक नियमित व्यायाम करतात. यात अनेक जण वॉकिंग, जॉगिंग करतात तर काही लोक जिमला जातात. पण काही वेळा व्यायामाचे इतर प्रकार करताना स्ट्रेचिंग करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. कोणतेही व्यायाम करताना वॉर्म करणे म्हणजे शरीर तयार करणे आवश्य आहे. तसेच स्ट्रेचिंग एक्सरसाईज सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. रोज पाच मिनिटे स्ट्रेचिंग केल्याने शरीरातील ब्लड सर्कुलेशन वाढते तसेच स्नायू दुखणे आणि क्रॅम्प कमी होतात, असे फिटनेस तज्ञ सांगतात. विशेष म्हणजे तुम्ही हे स्ट्रेचिंग व्यायाम सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही घरी करु शकता. चला तर मग जाणून घ्या रोज कोणते स्ट्रेचिंग एक्सरसाईज केले पाहिजे. येते.
लेग स्ट्रेच एक्सरसाइज करण्यासाठी दोन्ही हात छातीसमोर भिंतीवर ठेवा. नंतर शरीराचे वजन उजव्या पायावर ठेवून डावा पाय वर करा. गुडघ्याजवळ पाय वाकवून, हिपजवळ टाच घ्या. नंतर पाय खाली घ्या. दुसऱ्या पायानेही असेच करा.
सोफा किंवा खुर्चीवर बसा. दोन्ही पाय समोर करा आणि दोन्ही हातांनी पायाची बोटे धरून कंबर आणि खांद्यामध्ये ताण फिल करा. यामुळे तुमच्या पाठ आणि कंबरेच्या स्नायूंना आराम मिळेल.
उभे राहून तुमचे पाय खांद्याच्या रुंदीपर्यंत पसरवा. पायाचे तळवे हातांना समांतर करा. आता पाय गुडघ्याजवळ वाकवा आणि ९० अंशांचा कोन करून थांबा. हे नियमित केल्याने फायदा होतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)