Fitness Mantra: सुटलेले पोट कमी करण्यासाठी रोज करा हे कार्डिओ एक्सरसाइज, आठवड्याभरात दिसेल परिणाम-fitness mantra do these easy cardio exercise to reduce belly fat and weight loss ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Fitness Mantra: सुटलेले पोट कमी करण्यासाठी रोज करा हे कार्डिओ एक्सरसाइज, आठवड्याभरात दिसेल परिणाम

Fitness Mantra: सुटलेले पोट कमी करण्यासाठी रोज करा हे कार्डिओ एक्सरसाइज, आठवड्याभरात दिसेल परिणाम

Jan 10, 2024 10:25 AM IST

Cardio Exercise for Weight Loss: जर तुम्ही पोटाची चरबी कमी करण्यासाठी सोपा मार्ग शोधत असाल तर तुमच्या खाण्यावर नियंत्रण ठेवा आणि दररोज व्यायाम सुरू करा. वेट लॉस आणि बेली फॅट कमी करण्यासाठी जाणून घ्या कार्डिओ एक्सरसाइज रुटीन

वजन आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी कार्डिओ एक्सरसाइज
वजन आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी कार्डिओ एक्सरसाइज (unsplash)

Easy Cardio Exercise to Reduce Belly Fat: वजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवण्यासोबतच कार्डिओवरही लक्ष केंद्रित करणे सुद्धा आवश्यक आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी, रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी, शरीरातील चरबी कमी करण्यासाठी आणि पोट आणि कंबरचा घेर कमी करण्यासाठी कार्डिओ महत्वाचे आहे. यासोबतच फिजिकल अॅक्टिव्हिटींचा रूटीनमध्ये समावेश करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. शरीरात जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये काही सोप्या व्यायामाचा समावेश करू शकता. अशा कार्डिओ एक्सरसाइजबद्दल जाणून घ्या जे तुमच्या पोटाची चरबी कमी करण्यासोबतच वजन वेगाने कमी करण्यास मदत करू शकतात.

लेग रेज

हा व्यायाम पाठीवर झोपून केला जातो. त्यामुळे पोटावर दबाव येतो. ज्यामुळे वजन झपाट्याने कमी होते. हा व्यायाम तुमच्या कार्डिओ रुटीनमध्ये नक्की समाविष्ट करा.

आर्म सर्कल्स

हा व्यायाम बसून किंवा उभे राहून सहज करता येतो. यामध्ये हात घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने सर्कुलर मोशनमध्ये फिरवले जातात. हा व्यायाम वजन कमी करण्यासाठी तसेच हाताची चरबी कमी करण्यास मदत करतो.

पायऱ्या चढणे

तुम्ही तुमच्या वर्कआउट रुटीनमध्ये घरात असलेल्या पायऱ्यांचा समावेश करू शकता. यासाठी एकावेळी दोन पायऱ्या चढाव्या लागतात. लक्षात ठेवा की हा व्यायाम तुमच्या हृदय गती प्रणाली आणि पायांच्या स्नायूंना आणखी आव्हान देऊ शकतो.

सिट अप्स

सिट अप्स हे वजन कमी करण्यासाठी आणि पोटावरील चरबीसाठी उत्तम आहे. असे केल्याने पाठीचा कणा मजबूत होतो. यासोबतच तुमचे पोश्चर सुधारते.

 

सायकलिंग

हा व्यायाम देखील तुमचे वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे तुमच्या पोटाची चरबी झपाट्याने कमी होते. तुम्ही तुमच्या डेली रूटीनमध्ये सायकलिंगचा समावेश केला पाहिजे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner