Steps for Glowing Skin and Dark Circles: योगामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते आणि शरीर निरोगी राहिल्यास चेहऱ्यावर चमकही दिसून येते. आपल्या शरीराच्या फिटनेससोबतच चेहऱ्याचे फिटनेस सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. चेहऱ्याला योग्य पद्धतीने मसाज करून फिट ठेवता येते. चेहऱ्यावर पार्लरसारखी चमक हवी असेल आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळे नको असतील तर या काही स्टेप्स फॉलो करा. हे तुम्हाला फक्त नॅचरल ग्लो देणार नाही तर चेहऱ्याचा डलनेस आणि डार्क सर्कल दूर करण्यास मदत करतील. जाणून घ्या करण्याची योग्य पद्धत
डोळ्यांखालील काळी वर्तुळे तुम्हाला त्रास देत असतील तर रोज सकाळी हे छोटेसे उपाय केल्यास डार्क सर्कल्सची समस्या दूर होईल. दोन्ही हातांच्या दोन्ही बोटांच्या मदतीने डोळ्यांखाली आणि आजूबाजूला टॅप करा. ही प्रक्रिया दोन ते तीन सेकंदांसाठी करा. दररोज या उपायांचा अवलंब केल्यास डोळ्यांखाली काळी वर्तुळाची समस्या राहणार नाही.
जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो आणि शाइन हवी असेल तर ही स्टेप रोज करा. पहिल्या बोटाच्या मदतीने नाकपुडीजवळच्या हाडावर दोन्ही बाजूला एकत्र दाबा आणि सोडा. ही प्रक्रिया सुमारे ४-५ सेकंदांसाठी करा. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात बोटांच्या मदतीने नाकपुडीपासून कपाळापर्यंत राउंड शेपमध्ये मसाज करा. ही प्रक्रिया सुमारे ४-५ सेकंदांसाठी करा. दररोज या तीन स्टेप्सचे पालन केल्याने चेहऱ्यावर डलनेस दिसणार नाही. तसेच चेहरा उजळेल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या