Exercises to reduce arm fat: पावसाळा असो किंवा उन्हाळा अशावेळी उष्णता टाळण्यासाठी बहुतांश लोक स्लीव्हलेस कपडे घालणे पसंत करतात. जर तुम्हालाही स्लीव्हलेस कपडे घालायला आवडत असतील पण हाताच्या लटकलेल्या चरबीमुळे तुम्हाला आवडते कपडे घालता येत नसतील तर हे ३ व्यायाम तुम्हाला तुमच्या समस्येवर मात करण्यास मदत करू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात असे कोणते ३ व्यायाम आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचे सैल पडलेले दंडही अगदी टोन करू शकता.
हातांची लटकलेली चरबी टोन करण्यासाठी स्किपिंगची मदत घेऊ शकता. स्किप करताना, म्हणजे दोरी उडी मारताना त्या व्यक्तीचे हात गोलाकार आणि वेगाने फिरतात. ज्यामुळे हातांना घाम येतो आणि हातांची चरबी वितळण्याबरोबरच टोनिंगही केले जाते. हा एक खूप चांगला कार्डिओ व्यायाम आहे.
हातांची चरबी कमी करण्यासाठी पुशअप हा देखील एक चांगला व्यायाम असू शकतो. जरी आपल्याला हा व्यायाम करणे थोडे अवघड वाटत असले तरी पुशअपमुळे केवळ हातांचीच नव्हे तर संपूर्ण शरीराची चरबी कमी होऊन स्नायू बळकट होतात.
सर्व प्रथम, अशी जागा निवडा जिथे आपण आपले हात आपल्या पाठीमागे उंचीवर ठेवू शकता. यासाठी सर्वप्रथम तुम्ही खाली बसा आणि मागून या पृष्ठभागावर हात घेऊन जावा. आता तुमचे शरीर पुढे करा आणि फक्त तुमच्या टाचा जमिनीवर ठेवा आणि शरीराला धरा, आता तुमच्या हातांवर जोर देताना शरीर खाली वाकवा.
हातावर जमा झालेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी सिसार व्यायाम देखील एक चांगला मार्ग ठरू शकतो. हा व्यायाम करताना त्या व्यक्तीला उभे राहून आपले दोन्ही हात सरळ करावे लागतात आणि कात्रीप्रमाणे एकमेकांवर एकत्र हात करावे लागतात. हा व्यायाम अनेकवेळा केल्याने हातामध्ये साठलेली चरबी कमी होऊ शकते.
तुम्ही आर्म सर्कल अगदी सहज करू शकता. हा एक अतिशय सोपा व्यायाम आहे. हे करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्ही सरळ उभे रहा. आता तुमचे हात १८० अंश पसरवा आणि हळूहळू हात वर्तुळात फिरवा. म्हणजेच तुमचे हात पूर्णपणे ३६० अंश फिरवा. यामुळे तुमच्या हातातील चरबी झपाट्याने कमी होईल.
बायसेप कर्ल करण्यासाठी, प्रथम प्रत्येक हातात एक-एक डंबेल घ्या आणि हात सरळ ठेवा. आता डंबेल धरत असतानाच तुमचे हात खांद्यापासून वर करा. सुरुवातीला तुम्ही १० ते १२ वेळा हे करू शकता. हळूहळू सेट्सची संख्या वाढवा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)