Walking or Jogging Mistaks: आरोग्याची काळजी घेण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी जवळपास सर्वच फिटनेस गुरू अर्धा तास चालण्याचा सल्ला देतात. पण केवळ अर्ध्या तासाच्या या चालण्याचा पूर्ण फायदा दिसतो, जेव्हा तुम्ही काही चुका पुन्हा करत नाही. तसं तर फिजिकल वर्कआउट फिट आणि स्लिम राहण्यास मदत करते. त्याच वेळी हृदयाच्या रुग्णांसाठी चालणे खूप महत्वाचे आहे. कारण त्यांना इतर शारीरिक व्यायाम करणे करायला नाही म्हटले जाते. पण चालताना सुद्धा काही गोष्टी लक्षात ठेवा. जेणेकरून चालण्याचा पूर्ण फायदा शरीराला मिळू शकेल. जाणून घ्या या कोणत्या गोष्टी आहेत.
तुम्ही फिरायला बाहेर पडल्यावर काही अंतरापर्यंत तुमचा स्पीड खूप वेगवान असतो. पण काही वेळाने तुमचे शरीर थकते आणि तुम्ही खूप मंद होता. अशा चालण्याने जास्त फायदा होणार नाही. चालण्याचा पूर्ण फायदा घेण्यासाठी तुमचा स्पीड एकसारखा ठेवा. जेणेकरुन तुम्हाला बराच वेळ चालता येईल आणि पूर्ण फायदा मिळेल.
अर्धा तास चालताना तहान लागू शकते. अशा परिस्थितीत हायड्रेशन टाळणे योग्य नाही. पण भरपूर पाणी प्यायल्यानंतर लगेच चालायला सुरुवात करू नका. यामुळे पोटाच्या एका बाजूला वेदना होऊ शकतात. डिहायड्रेशन टाळण्यासाठी नेहमी एक एक घोट करून पाणी प्या.
जरी वॉक स्ट्रेट राहून केली जाते. तरी हे करताना थोडे स्ट्रेच करणे सुद्धा चांगले असते. हे स्नायूंना आराम देते आणि कोणत्याही प्रकारची दुखापत टाळते.
चालताना हात हलवणे महत्त्वाचे आहे. पूर्णपणे हात स्थिर ठेवून चालण्याने फारसा फायदा होत नाही. हात हलवून चाचल्याने स्पीड वाढते आणि पायांचा तोल राखण्यास मदत होते. त्यामुळे चालताना हात हलवत रहा.
जर तुम्ही मान खाली ठेऊन मोबाईल फोनकडे बघत असाल तर ही चुकीची पद्धत आहे. चालताना नेहमी आपले पोश्चर सरळ असावे. चालताना नेहमी सरळ पुढे पाहावे. जेणेकरून मान, खांदे आणि पाठ सर्व स्थिर आणि योग्य स्थितीत राहतील.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)