Fitness Mantra: वयाच्या चाळीशी नंतर राहायचे असेल फिट तर आपल्या रुटीनमध्ये समाविष्ट करा हे एक्सरसाइज
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Fitness Mantra: वयाच्या चाळीशी नंतर राहायचे असेल फिट तर आपल्या रुटीनमध्ये समाविष्ट करा हे एक्सरसाइज

Fitness Mantra: वयाच्या चाळीशी नंतर राहायचे असेल फिट तर आपल्या रुटीनमध्ये समाविष्ट करा हे एक्सरसाइज

Jun 15, 2024 12:09 PM IST

Fitness after 40s: जर तुम्हाला ४० नंतर तुमच्या शरीरात ताकद आणि शक्ती हवी असेल तर या तीन प्रकारच्या व्यायामांचा तुमच्या डेली रुटीनमध्ये नक्कीच समावेश करा. हे व्यायाम विशेषतः महिलांसाठी खूप महत्वाचे आहेत.

वयाच्या चाळीशी नंतर फिट आणि हेल्दी राहण्यासाठी व्यायाम
वयाच्या चाळीशी नंतर फिट आणि हेल्दी राहण्यासाठी व्यायाम

Exercise to Stay Fit and Healthy After 40s: वयाची चाळीशी ओलांडल्यावर शरीरात ताकद कमी जाणवू लागते. ज्याचे मुख्य कारण म्हणजे हाडे कमजोर होणे हे आहे. त्यामुळे दैनंदिन कामे करताना किंवा जड वस्तू उचलण्यात अनेकदा अडचण येते. जर तुम्हाला शरीराचा समतोल आणि स्थिरता राखायची असेल, तर चाळीशी नंतरच्या तुमच्या रुटीनमध्ये या एक्सरसाइजचा नक्कीच समावेश करा. यामुळे शरीराची ताकद ४० नंतरही टिकून राहते. वयाच्या चाळीशी नंतर फिट आणि हेल्दी राहण्यासाठी हे व्यायाम खूप उपयुक्त आहेत.

या व्यायामांसह चाळीशी नंतर राहा फिट

स्क्वॅट्स

फिटनेस तज्ञांचा असे मत आहे की, स्क्वॅट्स केल्याने एकाच वेळी अनेक मसल्स ग्रूपवर परिणाम होतो. त्यामुळे शरीराला कार्यक्षम शक्ती मिळते आणि ही कार्यशील शक्ती चालणे, जिने चढणे, कोणतीही वस्तू उचलणे या दैनंदिन कामासाठी आवश्यक असते. स्क्वॅट्स केल्याने शरीर संतुलित आणि स्थिर होण्यास मदत होते. कारण लोक मोठे झाल्यावर अडखळतात आणि पडतात. जे हाडे तुटण्याचे आणि फ्रॅक्चरचे कारण बनते.

डेडलिफ्ट

महिला आणि पुरुष दोघांच्याही शरीराची ताकद वाढवण्यासाठी डेडलिफ्ट व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. या व्यायामाच्या मदतीने पाठदुखी आणि पोश्चर सुधारण्यास मदत होते. याशिवाय हातांची पकडही मजबूत करते. जो वाढत्या वयाबरोबर सैल होत जातो. चाळीशी नंतर महिलांमध्ये हाडांची घनता कमी होऊ लागते. अशा स्थितीत डेडलिफ्ट केल्याने हाडांची घनता वाढते आणि ऑस्टिओपोरोसिससारख्या समस्यांना प्रतिबंध होतो. डेड लिफ्ट करण्यासाठी, कंबरेपासून पुढे वाका. आपली कंबर सरळ करा आणि नंतर जमिनीवर ठेवलेले वजन उचला. तथापि हा व्यायाम फिटनेस तज्ञांच्या देखरेखीशिवाय करू नये.

पुशअप्स

शरीराच्या वरच्या भागांना बळकट करण्यासाठी पुशअप्स हा सर्वोत्तम व्यायाम आहे. यामुळे छाती, खांदे, मनगट तसेच कोअर मजबूत होतो. तुमच्या फिटनेस लेव्हलनुसार पुशअप्स करता येतात. वॉल पुशअप नवशिक्यांसाठी योग्य असले तरी, संपूर्ण शरीर जमिनीवर उचलून केल्याने हाय फिटनेस लेव्हल दिसून येते. पुशअप्स केल्याने कार्डिओव्हस्कुलर फिटनेस सुधारतो. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊ लागतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner