मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Brushing Teeth: तुमची ब्रश करण्याची पद्धत चुकीची तर नाही ना? जाणून घ्या टिप्स

Brushing Teeth: तुमची ब्रश करण्याची पद्धत चुकीची तर नाही ना? जाणून घ्या टिप्स

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 15, 2024 09:29 PM IST

Right way to do brush: ब्रश करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे दातांचे आरोग्य बिघडते. त्यामुळे काही टिप्स फॉलो करणे गरजेचे आहे.

Oral Health Tips
Oral Health Tips (Freepik)

Dental Health Care: सकाळी उठल्यावर सगळेच ब्रश करतात. अंघोळीप्रमाणेच दातांची काळजी (Oral Health) घेणे गरजेची असते. दररोज ब्रश करणे हा केवळ आपले दात, तोंड स्वच्छ ठेवण्याचा एक मार्ग नाही तर त्यामुळे एकंदरीत आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठीचा एक सोपा मार्ग आहे. अमेरिकन डेंटल असोसिएशनने दिवसातून दोनदा २ मिनिटे ब्रश करावे असं सांगितले आहे. योग्य पद्धतीने आणि २ वेळा ब्रश केल्याने हिरड्यांचे आजार आणि दात किडणे टळू शकते. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते. परंतु काही लोकांना योग्य पद्धत माहित नसल्यामुळे तोंडाचे आरोग्य बिघडते.

कसा करायचा ब्रश?

ब्रश खरेदी करता त्याचे ब्रिस्टल्स मऊ असावेत हे लक्षात घ्या. यामुळे हिरड्यांवर दबाव येणार नाही. खूप मोठा किंवा छोटा ब्रश वापरल्याने तुमच्या दातांना इजा होऊ शकते. जर ब्रशचे ब्रिस्टल्स हार्ड असतील तर ते तुमच्या हिरड्या खराब करू शकते. यामुळे ब्रशची निवड योग्य करावी. रोज फक्त २ ते ३ मिनिटे ब्रश करा. यापेक्षा जास्त वेळ बेष्ट केल्यास दात कमकुवत होतात.

World Oral Health Day: या सोप्या पद्धतीने राखा ओरल हायजीन, दात आणि हिरड्या राहतील निरोगी

कोणत्या प्रकारचे टूथपेस्ट वापरावी?

तुम्ही जी टूथपेस्ट वापरत आहात त्यामध्ये योग्य प्रमाणात फ्लोराईड असणे आवश्यक आहे. मोठ्यांच्या टूथपेस्टमध्ये १३५० पीपीएम फ्लोराईड असणे आवश्यक आहे, तर ६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी टूथपेस्टमध्ये १००० पीपीएम फ्लोराइड असणे आवश्यक आहे. ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांनी फक्त वाटाण्याच्या आकाराची अर्थात फार कमी टूथपेस्ट वापरावी.

World Oral Health Day: दातांवरील पिवळेपणा नॅचरली दूर करतात हे फळं, ओरल हेल्थसाठीही आहे फायदेशीर

या गोष्टीही जाणून घ्या

> ब्रश व्यतिरिक्त तुम्ही दात स्वच्छ करण्यासाठी बाभळीच्या झाडाचा टूथब्रश देखील वापरू शकता. यामुळे दात मजबूत होतात. यामुळे दाताला किड लागत नाही आणि दुर्गंधी येत नाही.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel