
Filter Coffee Recipe: जगभरात कॉफी प्रेमी आहेत. कॉफी बनवण्याचे अनेक मार्ग आहेत आणि प्रत्येकाची चव वेगळी असते. दक्षिण भारतात बनवलेली फिल्टर कॉफी अनेकांना आवडते. पण तुम्हाला हे जाणून अभिमान वाटेल की फिल्टर कॉफीचा स्वाद एटलसमध्ये जगभरातील टॉप ३८ कॉफीमध्ये दुसरे स्थान मिळाले आहे. म्हणजे फक्त भारतातच नाही तर इतर देशांतील लोकही फिल्टर कॉफी पसंत करतात आणि पितात. जर तुम्ही अजून फिल्टर कॉफी टेस्ट केली नसेल तर तुम्ही ती घरी या पद्धतीने तयार करू शकता. घरी ही कॉफी बनवणे खूप सोपे आहे. चला तर मग जाणून घ्या दक्षिण भारतीय फिल्टर कॉफी बनवण्याची रेसिपी
- ५ चमचे कॉफी पावडर
- १ कप गरम दूध
- ३-४ चमचे साखर
साउथ इंडियाची प्रसिद्ध फिल्टर कॉफी बनवण्यासाठी फिल्टर कॉफी मशीनच्या गाळणीत कॉफी पावडर टाका. कॉफी प्रेसने थोडेसे दाबा आणि कंटेनरच्या वर ठेवा. आता एक चतुर्थांश कप गरम पाणी घाला. झाकण बंद करून अर्धा तास तसंच राहू द्या. ज्यामुळे कॉफीचे घट्ट द्रावण तयार होते. आता एका लहान ग्लासमध्ये एक चमचा तयार घट्ट कॉफीचे द्रावण टाका. तसेच एक चमचा साखर, एक चतुर्थांश गरम दूध घालून मिक्स करा. अशाच पद्धतीने बाकीची कॉफी सुद्धा तयार करा आणि गरम गरम सर्व्ह करा. तुमच्याकडे कॉफी फिल्टर नसेल तर गाळणीवर मलमलचे कापड बांधा. नंतर ते एका कंटेनरच्या वर ठेवा. नंतर गाळणीवर कॉफीसह पाणी टाकण्याची पद्धत पुन्हा करा. याने फिल्टर कॉफी तयार होईल.
संबंधित बातम्या
