Figs Are Non Veg Fruit : सोशल मीडियावर नेहमीच काहीना काही गोष्टी व्हायरल होत आहे. गेल्या काही काळात अंजीर हे मांसाहारी फळ आहे की शाकाहारी, यावर चर्चा सुरू झाली आहे. या वादामागे अनेकांनी असा दावा केला आहे की, शाकाहारी लोकांसाठी ते योग्य नाही कारण ते किडीद्वारे वाढते, जी नंतर त्याच्या आतच मरते.
अंजीर पश्चिम आशिया आणि भारतात लोकप्रिय आहे, या प्रदेशांमध्ये ते ड्रायफ्रूट म्हणून खाल्ले जाते. असे मानले जाते की ही फळ आहे, परंतु प्रत्यक्षात ती उलटी फुले आहेत, ज्यांच्या पाकळ्या त्यांच्या आत लपलेल्या असतात. पण अलीकडच्या चर्चेचं सर्वात मोठं कारण म्हणजे अंजीरमध्ये असलेला कीटक, हा किडा अंजीरफळाच्या आत जाऊन सजीवांच्या शरीरात निर्माण होणारे द्रव्य बनवतो, ज्यामुळे अनेक जण त्याला मांसाहारी फळ असल्याचे म्हणत आहे.
भारतीय अभिनेत्री शेनाज ट्रेझरीवालाने सोशल मीडियावर अंजीरला मांसाहारी म्हणणारा व्हिडीओ शेअर करत आहे. त्यामागचे कारण सांगताना तिने म्हटले की, ‘अंजीर परागण करत असताना त्यात मादी अंजीर कीटक प्रवेश करते. या प्रक्रियेत कीटक आपले पंख गळून गेल्यामुळे फळांच्या आत अडकतो. ती त्याच फळाच्या आत अंडी घालते आणि त्यातच मरून जाते. यानंतर आत नवीन नर आणि मादी संभोग करतात, ज्यात नर जागीच मरतो आणि मादी अंजीर पळून जाते.’ शेनाझ म्हणाल्या की, ‘अंजीर खाल्ले तर समजा की, एखादा कीटक त्याच्या निर्मितीतच मरण पावला आहे. हे फळ त्यापासूनच तयार झाले आहे. यामुळे शाकाहारी लोकांसाठी हे फळ नाही.’
या चर्चेबाबत अनेक लोक असे म्हणत आहेत की, या प्रक्रियेत कीटक अंजीराच्या आत परजीवी म्हणून राहतो, पण तसे नाही. फळातील एंझाइम्स अन्नद्रव्यांच्या स्वरूपात किडीचे शरीर बदलून टाकतात. शिवाय या पद्धतीने किडीसह सर्व अंजीर नैसर्गिक परागीभवन पद्धतीवर अवलंबून नसतात. अनेक शेतकऱ्यांनी थेट अंजीरावर वनस्पती संप्रेरक लावून अंजीराचे परागण केले आहे. हा दृष्टिकोन अधिक शाकाहारी-अनुकूल पर्याय मानला जाऊ शकतो. तथापि, जैन आणि ब्राह्मण समाजातील बरेच लोक अजूनही अंजीर टाळतात. कारण, त्यांना समजावून सांगणे कठीण आहे की, सर्व अंजीर कीटकांमुळे परागण होत नाहीत.'