How to Make Fenugreek Hair Oil: केस गाळणी हि फारच मोठी समस्या आहे. अनेक वयोगटातील लोक ही समस्या फेस करत आहेत. यावर बाजारात मिळणारे प्रोडक्ट्स वापरले तरी त्याचा दुष्परिणाम होतो. अशावेळी यावर घरीच उपाय करणे उपयुक्त ठरते. मेथीच्या दाण्यांमध्ये केसांसाठी उपयुक्त असे पदार्थ असतात. मेथीमध्ये एक विशेष संयुग लेसिथिन असते जे केसांची वाढ होणाया मदत करते. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, के, प्रथिने, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फेट, फॉलिक अॅसिड, सॅपोनिन आणि फ्लेव्होनॉइड्स असे अनेक घटक असतात. हे घटक केसांचे पोषण आणि त्यांची लांबी वाढवण्यास मदत करतात. बाजारात मेथीचे तेल खूप महाग आहे परंतु तुम्ही ते घरी बनवू शकता आणि दीर्घकाळ वापरू शकता. चला तर मग जाणून घेऊया केसांसाठी मेथीचे तेल कसे बनवायचे.
मेथीचे दाणे भाजून घ्या. यानंतर त्याला बारीक करून त्याची पावडर बनवा. ही पावडर खोबरेल तेलात मिसळा आणि तेल तयार करा. या तेलाने केसांना मसाज करा. यामध्ये हवे असल्यास तुम्ही कढीपत्ताचाही वापर करू शकता. यामध्ये विशेष गुणधर्म असतात. जर तुम्हाला मेथीचे तेल जास्त दिवस वापरायचे असेल तर मेथीचे दाणे बारीक करून त्याची पावडर बनवा आणि खोबरेल तेलात मिसळा. मध्ये हे तेल तयार करा आणि नंतर ते बराच वेळ वापरत राहा.
> केस गळती थांबते.
> केस मऊ आणि चमकदार होतात.
> मेथीमध्ये मुबलक प्रमाणात लोह आणि पोटॅशियम असल्यामुळे केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येचा सामना करण्यास मदत होते.
> मेथीमुळे तुमच्या केसांमध्ये आर्द्रता वाढते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)