Health Benefits Of Fenugreek Leaves: हिवाळा ऋतू सुरू होताच बाजारात हिरव्या हिरव्या भाज्या दिसू लागतात. हिरव्या हिरव्या भाज्यांनी जेवणात भरपूर चव तर येतेच, पण आरोग्याशी संबंधित अनेक फायदेही मिळतात. त्याचे आरोग्यविषयक फायदे लक्षात घेता हिरव्या पालेभाज्यांची गणना सुपरफूड्समध्ये केली जाते. हिरव्यागार भाज्यांमध्ये मेथीच्या भाजीचा देखील समावेश होतो. मेथीची पाने देखील अशाच औषधी गुणधर्मांचा खजिना मानली जातात. आयुर्वेदानुसार मेथीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह, फायबर आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. जे वजन कमी करण्यापासून ते रक्तातील साखर नियंत्रणापर्यंत मदत करतात. मेथीच्या उष्णतेमुळे हिवाळ्यात शरीरात उष्णता निर्माण होऊन शरीराचे तापमान संतुलित राखण्यास मदत होते. चला तर मग, जाणून घेऊया मेथी खाण्याचे आरोग्याशी संबंधित अनेक आश्चर्यकारक फायदे.
मेथीमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात असतात. ज्यामुळे पचनाशी संबंधित समस्या कमी होऊन बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन दूर होते.
हिवाळ्यात अनेकदा वजन वाढण्याची तक्रार लोक करतात. जर, तुमचीही अशीच समस्या असेल तर, आपल्या हिवाळ्यातील आहारात मेथीचा समावेश करा. मेथीमध्ये असलेले फायबर अन्न पचवण्यास मदत करते. मेथीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त आणि कॅलरीज कमी असतात, ज्यामुळे व्यक्तीला लवकर भूक लागत नाही आणि पोट बराच वेळ भरलेले राहते. याच्या पानांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स चयापचय चांगले ठेवून चरबी बर्न करणे सोपे करतात.
कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी मेथी तुम्हाला मदत करू शकते. मेथीच्या दाण्यांमध्ये नारिन्जेनिन नावाचा फ्लेव्होनॉइड गुणधर्म असतो. हे रक्तातील लिपिडची पातळी कमी करून प्रवाह सुरळीत करण्याचे काम करते. याशिवाय यात असलेले अँटिऑक्सिडेंट गुणधर्मही उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.
फायबरयुक्त मेथीचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. मेथीच्या पानांमध्ये अमिनो अॅसिड असते जे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.
वाढत्या वयात सांध्यांमध्ये सूज आणि दुखण्याची समस्या उद्भवते. अशावेळी मेथीची भाजी या दुखण्यापासून सुटका होण्यास मदत करू शकते. मेथीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे सांधेदुखी आणि सूज कमी होते.