Healthy Lifestyle: आजच्या धकाधकीच्या, फास्ट लाइफस्टाइलमध्ये निवांतपणा मिळणे अवघड होऊन बसले आहे. आजकाल अनेकदा काम करताना अचानक एनर्जी कमी होते यामुळे काम वेळेवर पूर्ण करता येत नाही. थंडीच्या दिवसात तर अजिबात काम करावंसं वाटतं नाही. दिवसही खूप शांत शांत वाटतो. अशा परिस्थितीत झोप घ्यावीशी वाटते. तुम्ही पॉवर नॅप घेऊ शकता. तुम्हाला माहित आहे का की पॉवर नॅप तुम्हाला या समस्यांशी लढण्यासाठी मदत करू शकते. यामुळे तुम्हाला ताजेतवाने तर वाटतेच पण शरीराला एनर्जीही मिळते. पॉवर नॅप म्हणजे काय आणि ते तुमच्यासाठी कसे फायदेशीर ठरू शकते ते जाणून घ्या.
पॉवर नॅप म्हणजे काय हे सोप्प्या भाषेत सांगायचं झालं तर अर्थ होतो एक छोटी डुलकी. ही डुलकी घेतल्याने शरीराला आराम मिळतो. पॉवर डुलकी घेण्याचा योग्य मार्ग म्हणजे फक्त १५ ते २० मिनिटे. लक्षात घ्या की ही झोप अर्ध्या तासापेक्षा जास्त नसावी, कारण त्यानंतर शरीर गाढ झोपेत जाते आणि जागे झाल्यानंतर तुम्हाला सुस्त वाटू शकते.
> पॉवर नॅप घेतल्याने शरीराला विश्रांती मिळते, शरीरात पुन्हा ऊर्जा येते.
> पॉवर नॅप हृदयाचे आरोग्य आणि मानसिक आरोग्य राखण्यास मदत करते.
> यामुळे शरीराला पुन्हा वेगाने काम करण्याची ताकद मिळते.
> यामुळे तुमची कामाची क्षमता वाढू शकते, कारण यानंतर शरीर एकदम रिलॅक्स होते.
> अमेरिकन स्लीप असोसिएशनच्या मते, पॉवर नॅप तरुणांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे, त्यामुळे त्यांचा ताणही कमी होतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)