Walking pneumonia : दिल्लीत दहशत माजवणारा 'वॉकिंग न्यूमोनिया' आहे काय? जाणून घ्या या गंभीर आजाराची लक्षणे
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Walking pneumonia : दिल्लीत दहशत माजवणारा 'वॉकिंग न्यूमोनिया' आहे काय? जाणून घ्या या गंभीर आजाराची लक्षणे

Walking pneumonia : दिल्लीत दहशत माजवणारा 'वॉकिंग न्यूमोनिया' आहे काय? जाणून घ्या या गंभीर आजाराची लक्षणे

Nov 22, 2024 03:26 PM IST

Symptoms of walking pneumonia in marathi: गेल्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता अत्यंत गंभीर बनली आहे. लोकांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे. दरम्यान, न्यूमोनियाच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे.

What is walking pneumonia in marathi
What is walking pneumonia in marathi

What is walking pneumonia in marathi:  दिल्लीतील प्रदूषणाची स्थिती चिंताजनक आहे. गेल्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता अत्यंत गंभीर बनली आहे. लोकांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे. दरम्यान, न्यूमोनियाच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. वॉकिंग न्यूमोनिया सामान्यतः न्यूमोनियापेक्षा कमी गंभीर मानला जातो. यासाठी ना अंथरुणावर विश्रांतीची गरज आहे किंवा रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. म्हणूनच याला वॉकिंग न्यूमोनिया म्हणतात.

वॉकिंग न्यूमोनिया कसा होतो?

वॉकिंग न्यूमोनिया सामान्यतः मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया नावाच्या जीवाणूमुळे होतो. या जीवाणूमुळे होणारा संसर्ग सौम्य असतो. परंतु काही प्रकरणांमध्ये गंभीर असू शकतो. हे शरीराच्या सामान्य तपासणी किंवा एक्स-रेद्वारे शोधले जाऊ शकते.

वॉकिंग न्यूमोनियाची लक्षणे काय आहेत?

ज्या लोकांना वॉकिंग न्यूमोनिया आहे त्यांना ताप, घसा खवखवणे आणि खोकल्याची तक्रार असू शकते. याशिवाय श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. हा रोग शिंकणे किंवा खोकल्यामुळे पसरतो. वॉकिंग न्यूमोनियाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला खोकला किंवा शिंक आल्यास तेच जीवाणू दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित होऊ शकतात. हा आजार गर्दीच्या ठिकाणी अधिक पसरतो. अशा परिस्थितीत बाजारपेठेबरोबरच शाळा-कॉलेजला जाणाऱ्या मुलांनीही ते टाळण्याची गरज आहे. हे टाळण्यासाठी तुम्ही घराबाहेर पडण्यापूर्वी मास्क वापरू शकता.

दिल्लीत शुक्रवारी सकाळी धुके होते आणि किमान तापमान ११.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्याच वेळी, हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत राहिली आणि AQI 373 वर नोंदवला गेला. दिल्लीतील 38 पैकी नऊ निरीक्षण केंद्रांवर AQI गंभीर श्रेणीत नोंदवण्यात आला.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, ही केंद्रे आनंद विहार, बवाना, जहांगीरपुरी, मुंडका, नेहरू नगर, शादीपूर, सोनिया विहार, विवेक विहार आणि वजीरपूर आहेत. चारशे किंवा त्याहून अधिक AQI गंभीर श्रेणीमध्ये मानला जातो आणि आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करू शकतो.

दिल्लीच्या हवेच्या गुणवत्तेने रविवारी प्रथमच गंभीर श्रेणी ओलांडली, त्यानंतर सोमवारी सकाळी ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन (GRAP) अंतर्गत चौथ्या टप्प्यावर निर्बंध लागू करण्यात आले. या उपायांमध्ये बांधकामावर पूर्ण बंदी, शाळा बंद आणि वाहनांवर कडक निर्बंध यांचा समावेश आहे.

Whats_app_banner