Symptoms Of Liver Inflammation In Marathi: फॅटी लिव्हर हा आजार खराब जीवनशैलीशी संबंधित आजार आहे. फॅटी लिव्हर डिसीजमध्ये ज्या व्यक्तीचा लिव्हरला त्रास होतो त्याच्या लिव्हरमध्ये सूज वाढते. लिव्हरला सूज येण्याचे एक प्रमुख कारण जास्त चरबीयुक्त आहार आहे. जे लोक जास्त तेल किंवा चरबीयुक्त, तळलेले अन्न खातात त्यांना फॅटी लिव्हर रोगाचा धोका जास्त असतो. लिव्हर हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे ज्याचे मुख्य कार्य अन्न पचवणे आणि शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ स्वच्छ करणे हे आहे. याशिवाय लिव्हर रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास आणि रक्तातील साखरेचा संचय करण्यास मदत करते.
जेव्हा लिव्हरमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवते तेव्हा लिव्हरला या सर्व प्रक्रिया पूर्ण करणे कठीण होते. त्याचप्रमाणे, जेव्हा लिव्हरच्या कार्याशी संबंधित समस्या वाढतात, तेव्हा लिव्हरच्या पेशींमध्ये चरबी जमा होते. वाढलेल्या चरबीमुळे लिव्हर आकार वाढू लागतो आणि लिव्हरला सूज येऊ लागते. जेव्हा लिव्हरची सूज वाढू लागते, तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसू लागतात. जाणून घेऊया लिव्हरला सूज वाढण्याची लक्षणे जी सकाळी शरीरात दिसू शकतात.
सकाळी उठल्यानंतर पोटात गॅस निर्माण होण्याची समस्या जाणवते का? याशिवाय, जर तुम्हाला ॲसिडिटी आणि पोटाला सूज येणे किंवा दुखणे यासारख्या समस्या असतील तर ते फॅटी लिव्हरचे लक्षण असू शकते.
सकाळी जर तुमच्या लघवीचा रंग जाड किंवा गडद पिवळा दिसत असेल तर ते लिव्हरशी संबंधित समस्येचे लक्षण असू शकते. जेव्हा लिव्हरमध्ये सूज वाढते तेव्हा लघवीशी संबंधित अशा समस्या देखील उद्भवू शकतात.
जर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर मळमळ आणि उलट्या सारख्या समस्या येत असतील तर तुम्ही तुमच्या लिव्हरच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. फॅटी लिव्हर रोगामध्ये उलट्या आणि मळमळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
लिव्हरला सूज येणे हे देखील सकाळी पोटदुखीचे कारण असू शकते. कारण, लिव्हरचा आकार वाढल्याने किंवा फॅटी लिव्हरमुळे पोटदुखीची तक्रार वाढू शकते. विशेषतः उजव्या बाजूला आणि पोटाच्या वरच्या भागात दुखणे ही लिव्हरशी संबंधित समस्या असू शकते.
वरील लक्षणांसोबतच भूक कमी होणे किंवा भूक न लागणे, सांधे आणि स्नायू दुखणे, दिवसभर थकवा जाणवणे, डोळे आणि नखे पिवळसर होणे, त्वचेवर खाज सुटणे अशी काही लक्षणेसुद्धा दिसून येतात.